शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते तुमचीसुद्धा आर्थिक फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : सध्या सण - उत्सवाचा काळ असून, या फेस्टिव्हल सिझनमध्ये विविध ऑफर्स घेऊन लहान-मोठे व्यापारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : सध्या सण - उत्सवाचा काळ असून, या फेस्टिव्हल सिझनमध्ये विविध ऑफर्स घेऊन लहान-मोठे व्यापारी बाजारात दाखल होत आहेत. त्यांचे उत्पादन विकले जावे म्हणून ते फेस्टिव्हल सिझनचा आधार घेऊन ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या ऑफर्स देत आहेत. अशातच दाखविले जाते वेगळे आणि मिळते भलतेच काही. तेव्हा फसवणूक झाल्याचे कळल्यावर अनेक जण सायबर पोलीस स्टेशनची पायरी चढताना दिसत आहेत.

कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्राला मरगळ आली आहे. यामध्ये लहान-मोठे व्यापारी आता त्यांची तूट भरून काढण्यासाठी विविध आकर्षक ऑफर्स देऊन ग्राहकांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा फसव्या ऑफर्सना सर्वसामान्य ग्राहक बळी पडत असून, त्यांची फसवणूक होत असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे अशा फसव्या जाहिरातींवर विश्वास न ठेवता खातरजमा करून वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. त्यामुळे खरेदी करताना जरा जपून, करा असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

...अशी होऊ शकते फसवणूक

कधी कधी बऱ्याच आकर्षक ऑफर देऊन ग्राहकांना फसविले जाते, तर काही वेळा चुकीची ऑर्डर देऊन फसवणूक केली जाते. या ऑफरमध्ये नमूद केलेल्या किंवा दर्शविलेल्या ऑफर बऱ्याच वेळा चुकीच्या असतात. त्यांचा मुख्य हेतू लोकांना फसविणे, हा असतो. यानंतर इतरही मार्ग आपल्यासाठी फसवणारे ठरू शकतात.

काही वेळा ग्राहकांना वस्तू दाखविण्यात येतात. मात्र, डिलिव्हरीआधीच ग्राहकांडून पैसे मागविले जातात. पैसे ऑनलाईन पद्धतीने मागवूनही, त्या ग्राहकांना वस्तू दिल्या जात नाहीत. तसेच काही वेळा पैसे घेऊन खराब किंवा बऱ्याच वेळा दुसऱ्याच वस्तू पाठविल्या जातात.

...ही घ्या काळजी

माहितीच्या आणि विश्वासार्ह वेबसाईटवरून खरेदी करा, एसएसएल असलेल्या साईट्सद्वारेच खरेदी करा, कारण या वेबसाईट्स युझर्सने इनपुट केलेला डेटा संग्रहीत करण्यास अधिक सक्षम आहेत.

या साईट्स ओळखणे सोपे आहे. कारण त्या एचटीटीएऐवजी एचटीटीपीएसने सुरू होतात आणि त्यांच्या ॲड्रेस बारमध्ये लॉक पॅडलॉक चिन्ह असते.

वेबसाईटचे लुक्स बघून खरेदी करू नका. अनेकदा वेबसाईट दिसण्यास आकर्षक दिसते. मात्र, यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.

जर तुम्हाला अशा साईट्स ओळखायच्या असतील, तर प्रोडक्ट्सच्या माहितीत आणि वेबसाईटवर शब्दांमध्ये तुम्हाला अनेक चुका आढळतील.

नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, खोट्या जाहिरातींकडे आकर्षित न होता कमी पैशात आणि कमी खर्चात मोठी वस्तू मिळत असेल तर त्याची खात्री करून घ्यावी, काही अनुचित प्रकार वाटत असल्यास सायबर पोलिसांशी संपर्क करा.

-

विलास पाटील

प्रमुख दहशतवादविराेधी कक्ष

ऑनलाईन फसवणूक

जानेवारी ३

फेब्रुवारी २

मार्च ३

एप्रिल ३

मे ४

जून २

जुलै ३

ऑगस्ट ४