लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड : बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती बु. येथील ५० वर्षीय शेतकºयाने पुनोती शिवारात त्याच्या आईच्या नावे परिसरात असलेल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १४ मार्च रोजी घडली.भिका मोतीराम गोपनारायण असे मृतक शेतकºयाचे नाव आहे. पुनोती शिवारात त्याची आई द्रौपदाबाई मोतीराम गोपनारायण यांच्या नावे एक हेक्टर शेत आहे. आई वृद्ध असल्याने शेती सांभाळण्याची जबाबदारी भिका गोपनारायण हेच पार पाडत होते. तशातच सततची नापिकी, निसर्गाच्या अवकृपेने यंदा उद्भवलेली दुष्काळी स्थिती, दोन मुलींची लग्ने झाल्यानंतर वाढलेला कर्जाचा बोझा व अंगावरील पीक कर्ज भरण्याच्या चिंतेने ग्रस्त झाल्याने भिका गोपनारायण यांनी बुधवारी त्यांच्या आईच्या नावे असलेल्या शेतात विष प्राशन केले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना उपचारासाठी अकोल्यास नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी महिला तलाठी धनाडे यांनी वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. भिका गोपनारायण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई असा आप्त परिवार आहे.
बार्शीटाकळी : पुनोती येथील शेतक-याची विष घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:30 IST
सायखेड : बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती बु. येथील ५० वर्षीय शेतकºयाने पुनोती शिवारात त्याच्या आईच्या नावे परिसरात असलेल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १४ मार्च रोजी घडली.
बार्शीटाकळी : पुनोती येथील शेतक-याची विष घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देभिका मोतीराम गोपनारायण असे मृतक शेतक-याचे नाव