शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

बार मालकाला पोलिस कोठडी

By admin | Updated: May 13, 2014 21:06 IST

बारमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेल्या विदेशी दारूची विक्री करणारा बार मालकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी अटक केली.

अकोला: जय हिंद चौकातील एका बारमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेल्या विदेशी दारूची विक्री करणारा बार मालक नितीन वानखडे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १३ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. जय हिंद चौकातील एका ॲरिस्टो वाईन बारवर महिनाभरापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा घालून बारमधून महाराष्ट्रात बंदी असलेली लाखो रुपयांची विदेशी दारू जप्त केली होती. एवढेच नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अंधारात ठेवून बार मालकाने पाच वर्षांमध्ये शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला. याप्रकरणी दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. सावेदकर यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. मध्य प्रदेशातील एका बॅ्रन्डच्या दारू विक्रीला महाराष्ट्रात बंदी असल्यावरही अकोल्यातील जय हिंद चौकातील एका वाईन बारमध्ये या दारूची विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. पथकाने बारवर छापा घालून ३ लाख ३७ हजार ६९६ रुपयांची दारू जप्त केली. या प्रकरणी गोकर्णाबाई वानखडे, नितीन वानखडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींनी अनेकदा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले; परंतु न्यायालयाने आरोपी नितीन वानखडे याला जामीन नाकारला. गोकर्णाबाई वानखडे हिच्या वयाचा विचार करता तिला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आरोपी नितीन वानखडे हा फरार होता. त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी अटक केली.