शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पीक कर्ज वाटपातही बँकांची कुचराई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:01 IST

अकोला : रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना, ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ १ हजार ५६८ शेतकºयांना १४ कोटी ५६ लाख रुपयांचे रब्बी पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपात बँकांकडून कुचराई करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

- संतोष येलकर

अकोला : रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना, ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ १ हजार ५६८ शेतकºयांना १४ कोटी ५६ लाख रुपयांचे रब्बी पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपात बँकांकडून कुचराई करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते; परंतु उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ५७ हजार ९५ शेतकºयांना ४१९ कोटी ४७ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. म्हणजेच उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात खरीप हंगामात केवळ ३१ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना ७० कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १ हजार ५६८ शेतकºयांना १४ कोटी ५६ लाख रुपयांचे रब्बी पीक कर्ज वाटप करण्यात आले. कर्ज वाटपाचे अत्यल्प प्रमाण बघता, खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपात संबंधित बँकांकडून कुचराई करण्यात येत असल्याची बाब समोर येत असल्याने, जिल्ह्यातील रब्बी पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुष्काळात शेतकरी संकटात; कर्जाचाही आधार मिळेना!जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील सर्व गावांसह अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार महसूल मंडळातील गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात रब्बी पीक कर्ज वाटपाचे अत्यल्प प्रमाण बघता, दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला असताना रब्बी पीक कर्जाचा आधारही शेतकºयांना मिळत नसल्याची स्थिती आहे.

 

रब्बी हंगामात जिल्ह्यात ७०.२८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी डिसेंबर अखेरपर्यंत बँकांमार्फत जिल्ह्यातील १ हजार ५६८ शेतकºयांना १४ कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.-गोपाळ मावळेजिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक