शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

येस बँकेवर निर्बंध; धनादेश वटण्यास अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:50 IST

अकोला जनता, अकोला अर्बन आणि अकोला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येस बँकेत देशातील तीनशे पन्नासच्यावर सहकारी व इतर बँकांचे धनादेश वटविल्या जातात; (चेक क्लीअरन्स) परंतु रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्याने येस बँकेकडे वटविण्यासाठी टाकण्यात आलेल्या सहकारी बँकांच्या ग्राहकांचे धनादेश रखडल्याचे वृत्त आहे. यात अकोला जनता, अकोला अर्बन आणि अकोला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे.नॅशनल पेमेंट कार्पोरेशन आॅफ इंडियासोबत करार केल्यामुळे देशातील जवळपास दीडशेच्यावर सहकारी बँकांनी त्यांच्या ग्राहकांचे धनादेश वटविण्यासाठीच्या व्यवहारासाठी (क्लीअरन्स सेटलमेंट) येस बँकेची सेवा घेतली आहे. त्यामुळे बँकेकडे येणारे ग्राहकांचे धनादेश येस बँकेक डे पाठविण्यात येतात. हा आंतरबँकिंग व्यवसाय असल्याचे वृत्त आहे. येस बँक ही क्लीअरिंग हाउस म्हणून सहकारी बँकांचे धनादेश क्लीअर करण्याचे काम करीत आहे. तथापि, रिझर्व्ह बँकेने या बँकेवर एका निर्देशान्वये धनादेश वटविण्यासाठीचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांनी त्यांचे धनादेश वटविण्यासाठी पाठविले; परंतु वटले नाहीत. या संदर्भात अकोला जनता बँकेची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.आमच्या ग्राहकांचे धनादेश वटविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. व्यवस्थापन त्यादृष्टीने काळजी घेत आहे. यात आमच्या ग्राहकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी घाबरू नये.- अनंत वैद्य,मुख्य कार्यकारी अधिकारी,अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अकोला.सर्व धनादेश वटविण्याचे काम दोन दिवसांत नियमित होईल. तसे पत्रही रिझर्व्ह बँकेने दिले आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरू न जाऊ नये, तसेही येस बँक दोन दिवसांत स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे.- शंतनू जोशी,सीईओ, अकोला अर्बन बँक.

टॅग्स :Yes Bankयेस बँकAkolaअकोला