शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला; नितीन देशमुख यांना उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 13:35 IST

एकमेव बाळापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अकोला: जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला नेमका कोणता मतदारसंघ सुटणार, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत शिवसेना-भाजप युतीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी एकमेव बाळापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.कधीकाळी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांतून भगवा फडकविणाऱ्या शिवसेनेच्या मजबूत तटबंदीला २००९ नंतर सुरुंग लागला. २०१४ मध्ये शिवसेना-भाजपने युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. यामध्ये सेनेचा मजबूत गड मानल्या जाणाºया अकोट आणि अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले. तसेच अकोला पश्चिम व मूर्तिजापूर मतदारसंघातही भाजपने विजयी पताका कायम ठेवली. केवळ बाळापूर मतदारसंघात भाजपला पराभवाची चव चाखावी लागली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपने युती होणारच, असे अनेकदा ठामपणे स्पष्ट केले. जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असल्याने जिल्ह्यातून शिवसेनेच्या वाट्याला नेमका कोणता मतदारसंघ सुटणार, याबद्दल राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. घटस्थापनेच्या दिवशी युतीची अधिकृत घोषणा होईल, असे सेना-भाजपने स्पष्ट केले होते. रविवारी सायंकाळपर्यंतही युतीची घोषणा झाली नाही. अशा स्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला. ही बाब लक्षात घेता, युतीची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे चित्र समोर आले आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAkolaअकोलाbalapur-acबालापूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019