शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर : सात लाखांच्या खंडणीसाठी तीन दिवस डांबून ठेवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:47 IST

बाळापूर : अकोला येथील चौघा जणांनी ६ जानेवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडर्य़ाचे शे. अकील शे. रफीक (५0 ) यांना बाळापूरमधून  जबरदस्तीने  पळवून नेऊन तीन दिवस त्यांना डांबून ठेवले. त्यांच्याच मोबाइलवरून त्यांच्या मुलाच्या मोबाइलवर कॉल करून  सात लाख रुपयांची खंडणी मागितली.

ठळक मुद्देबाळापुरातून केले अपहरण : एकास अटक, तिघे पसार

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : अकोला येथील चौघा जणांनी ६ जानेवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडर्य़ाचे शे. अकील शे. रफीक (५0 ) यांना बाळापूरमधून  जबरदस्तीने  पळवून नेऊन तीन दिवस त्यांना डांबून ठेवले. त्यांच्याच मोबाइलवरून त्यांच्या मुलाच्या मोबाइलवर कॉल करून  सात लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास  जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत शे.फैद्दान शे.अकील यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शे.अकील यांची सुटका केली; तसेच कार जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे.   साखरखेर्डा येथील  शे. अकील शे.  रफीक हे अकोला  येथून साखरखेर्डा येथे परत जात असताना  ६ जानेवारी  रोजी  दुपारी  १ वाजता  एम. एच. ३0 ए. एफ. ८१0६ क्रमांकाच्या कारमधून  शे. युनूसखा  जब्बारखा  सिंधी कॅम्प रा. अकोला व इतर तिघे बाळापुरात आले. तेथे त्यांनी शे.अकील यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले. त्यांना ९ जानेवारीपर्यंत  काटेपूर्णा येथील झोपडपट्टीत डांबून ठेवले. त्यानंतर शे. अकील यांच्या मोबाइलवरून शे.फैद्दान शे. अकील यांना कॉल करून आरोपींनी त्यांना सात लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. सदर रक्कम न दिल्यास  शे.अकील यांना जीवे मारण्याची  धमकी दिली. या  अपहरणकर्त्यांविरोधात  शे. फैद्दान शे. अकील यांनी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये ९ जानेवारी रोजी रीतसर फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी ९ जानेवारीच्या रात्रीच काटेपूर्णा येथे जाऊन शे. अकील शे रफीक यांना अपहरणकर्त्यांच्या  ताब्यातून सोडविले. याप्रकरणी आरोपी  शे. युनूसखा जब्बारखा याला ताब्यात घेतले, तसेच अपहरणासाठी वापरलेली कार जप्त केली. दरम्यान, या अपहरण व खंडणी प्रकरणातील अन्य तीन आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास  ठाणेदार  विनोद  ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक  वाघमोडे,  हे.काँ. शुद्धोधन इंगळे, हे. काँ. जोशी  करीत आहेत.

आरोपीला पोलीस कोठडी- बाळापूर पोलिसांनी आरोपी युनूसखा जब्बारखा व अन्य अनोळखी तीन  आरोपींविरुद्ध भादंविच्या ३६४(अ), ३६३,३८६ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. - सदर आरोपीस बाळापूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाBalapurबाळापूरAkola Ruralअकोला ग्रामीण