शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर : कत्तलीसाठी जाणार्‍या चार गुरांना पोलिसांनी दिले जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:48 IST

बाळापूर :  बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील गुरांच्या बाजारातून खरेदी केलेल्या चार गुरांची मालवाहू वाहनातून वाहतूक करीत आणून बाळापूर  शहरातील  म्हैस  नदीजवळ उतरविण्यात येत  असताना  बाळापूर  पोलिसांनी  चारही गुरे व मालवाहू  वाहन जप्त  करुन वाहनचालकाला अटक  केल्याची घटना २५ जानेवारीला दुपारी २ वाजता घडली.

ठळक मुद्देबाळापुरात गुरासह वाहन जप्त वाहनचालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर :  बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील गुरांच्या बाजारातून खरेदी केलेल्या चार गुरांची मालवाहू वाहनातून वाहतूक करीत आणून बाळापूर  शहरातील  म्हैस  नदीजवळ उतरविण्यात येत  असताना  बाळापूर  पोलिसांनी  चारही गुरे व मालवाहू  वाहन जप्त  करुन वाहनचालकाला अटक  केल्याची घटना २५ जानेवारीला दुपारी २ वाजता घडली.खामगाव शहरातील गुरांच्या बाजारातून गुरे खरेदी करून ती मालवाहू वाहनातून बाळापूर  शहरात  आणून त्या गुरांची सध्या अवैध कत्तल केली  जात आहे. गोहत्याबंदी  कायदा लागू असताना बाळापुरात दररोज  शेकडो  गुरांची कत्तल करुन  त्याची विक्री  दुकान  लावून केली जात आहे. अशाच प्रकारे २५ जानेवारी रोजी खामगावच्या बाजारातून चार गुरांची खरेदी करून त्यांना मालवाहू वाहनातून बाळापूर येथे आणण्यात आले. त्या चारही गुरांना येथील म्हैस नदीजवळ वाहनातून दुपारी २ वाजता उतरविण्यात येत असताना बाळापूर  पोलीस  स्टेशनचे पोलीस  उपनिरीक्षक  विठ्ठल  वाणी यांनी ८0 हजार रुपये किंमतीचे एम.एच. ३0 एबी ८३९ क्रमांकाचे मालवाहू वाहन व २६ हजार रुपये किंमतीची चार गुरे असा एकुण एक लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सदर वाहनाचा  चालक साहेब खाँ युसुफखाँ (३0)  रा. पारस याला अटक  करून  त्याच्याविरुध्द पोलिस  उपनिरीक्षक  विठ्ठल  वाणी यांच्या फिर्यादीवरून  कलम ५,५(अ),५(ब) प्राणी  संरक्षण  कायदा १९७६चे कलम ११(ड),(ल), प्राण्यांना निर्दयपुर्वक वागणूक प्रतिबंधक कायदा १९६0च्या कलमानुसार  कारवाई केली आहे.

टॅग्स :BalapurबाळापूरCrimeगुन्हाArrestअटक