काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात अकोला पश्चिमसह बाळापूरचा गुंता कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:37 PM2019-09-02T12:37:20+5:302019-09-02T12:37:24+5:30

अकोला पश्चिम व बाळापूर या दोन विधानसभा मतदारसंघांचा गुंता कायमच असल्याचे संकेत आहेत.

Balapur and Akola West constituencies complex in Congress alliance | काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात अकोला पश्चिमसह बाळापूरचा गुंता कायम!

काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात अकोला पश्चिमसह बाळापूरचा गुंता कायम!

Next

- राजेश शेगोकार
अकोला : विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी निश्चित असून, २८८ जागांपैकी दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी १०० जागांबाबतची बोलणी संपली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या १०० जागांमध्ये अकोल्यातील अकोट, अकोला पूर्व व मूर्तिजापूरचा समावेश असून, दोन्ही पक्षांचा प्रबळ दावा असलेल्या अकोला पश्चिम व बाळापूर या दोन विधानसभा मतदारसंघांचा गुंता कायमच असल्याचे संकेत आहेत.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या सूत्रानुसार राष्टÑवादी काँग्रेसने केवळ मूर्तिजापूर हा एकमेव मतदारसंघ लढविला होता. आता मात्र अकोल्यातील पाचपैकी दोन मतदारसंघांसाठी राष्टÑवादी काँग्रेस आग्रही आहे. यापैकी मूर्तिजापूर हा मतदारसंघ जागा वाटपात राष्टÑवादीसाठी देण्यात आल्याची माहिती आहे.
अकोला पश्चिम हा मतदारसंघ मुस्लीमबहुल आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य गतवेळच्या तुलनेत यावेळी वाढलेले दिसून आले, तर भाजपाने सर्वच मतदारसंघांत घेतलेल्या आघाडीमध्ये सर्वात कमी आघाडी या मतदारसंघात होती. त्यामुळे काँग्रेसच्या या परंपरागत मतांची मोट बांधून विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांची मोठी फळी या मतदारसंघात आहे. विशेष म्हणजे, मुस्लीम समाजातील राज्यातील दिग्गज नेतेही या मतदारसंघावर डोळा ठेवून आहेत. गतवेळी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार दुसºया तर काँग्रेसचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर होता. त्यामुळे काँग्रेस, राष्टÑवादी आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसला देण्यात यावा, असा दावा समोर आला आहे. दुसरीकडे बाळापूर या मतदारसंघात काँग्रेसचा सातत्याने होणारा पराभव पाहता आता या मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसला संधी देण्याची मागणी राष्टÑवादीमधून होत आहे. त्यामुळे आगामी जागा वाटपाच्या चर्चेत या दोन मतदारसंघांपैकी राष्ट्रवादीचा कोणत्या मतदारसंघावरचा दावा मान्य केला जातो, यावरच पुढील राजकारणाची गणिते ठरणार आहेत.
 
उमेदवारीसाठी रंगणार स्पर्धा
मूर्तिजापूर या मतदारसंघात राष्टÑवादीकडे उमेदवारांची मोठी स्पर्धा असून, काँग्रेसकडे त्या तुलनेत उमेदवारांची दावेदारी कमी आहे. त्यामुळे जागा वाटपातील पहिल्याच टप्प्यात राष्टÑवादीला हा मतदारसंघ देण्यात आल्याचे समजते. अकोट, अकोला पूर्व या दोन मतदारसंघांत काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. या दोन्ही मतदारसंघांत उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे.
 
आज भाजप इच्छुकांच्या मुलाखती
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवार, २ सप्टेंबर रोजी मुलाखती होत आहेत. भाजपचे पक्ष निरीक्षक ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रत्येक इच्छुक उमेदवारासोबत चर्चा करणार आहेत.

 

Web Title: Balapur and Akola West constituencies complex in Congress alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.