शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बाखराबाद हत्याकांड; चौघांची निर्घृण हत्या करणाऱ्या पिता-पुत्रांना फाशीची शिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:48 IST

अकोला : बाखराबाद येथील एकाच परिवारातील चौघांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी  शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने आरोपी असलेल्या दोन मुले व बापास फाशीची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देविश्वनाथ माळी, वनमाला माळी, योगेश माळी व राजेश माळी यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवित त्यांची हत्या केली होती. या प्रकरणात आरोपींना १४ नोव्हेंबर रोजी दोषी ठरविले होते.झाडाच्या फांद्या तोडाव्या त्याप्रमाणे चौघांची हत्या केल्याने न्यायालयाने तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

अकोला: शेतीच्या वादातून माळी कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने साक्ष, पुराव्यांच्या आधारे शुक्रवारी आरोपी गजानन वासुदेव माळी याच्यासह त्याचे दोन्ही मुले नंदेश व दीपक माळी यांना फाशीची शिक्षा सुनावली. उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाखराबाद येथे १४ एप्रिल २0१४ रोजी ही घटना घडली होती.   मृतक राजेश व योगेशचे वडील भगवंतराव माळी यांनी आरोपी गजानन वासुदेव माळी याच्याशी दोन एकर शेती खरेदीचा इसार केला होता; परंतु नंतर गजाननने इसार करण्यास नकार दिला. त्यामुळे भगवंतरावांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आणि त्यांच्या न्यायालयाने भगवंतराव माळी यांना शेतीचा ताबा दिला. त्यामुळे १४ एप्रिल रोजी राजेश व योगेश माळी हे शेतात गेले होते. संतप्त गजानन माळी याने त्यांना धमकी दिली होती. योगेशने त्याची तक्रार उरळ पोलिसांत केली होती. तक्रार करून योगेश व राजेश हे बाखराबादला काका विश्वनाथ माळी यांच्याकडे आले. राजेश घरीच थांबला आणि योगेश व चुलत बहीण वनमाला रोकडे हे पुन्हा शेतात गेले. त्यांच्याच पाठोपाठ आरोपी गजानन माळी व त्याचे दोन मुले नंदेश व दीपक हे कडबा कटरचे पाते व कुºहाड घेऊन शेतात गेले आणि त्यांच्यावर सपासप वार करून त्यांना यमसदनी धाडले. त्यानंतर आरोपींनी विश्वनाथ माळी यांच्या घराकडे मोर्चा वळविला आणि घरात खाटेवर बसलेल्या राजेश माळीवर वार करून त्यास ठार केले. समोरून वृद्ध विश्वनाथ माळी येताना दिसल्यावर, त्यांच्यावरही वार करून ठार केले. या घटनेची एकमेव साक्षीदार पार्वतीबाई विश्वनाथ माळी या होत्या. पोलीस पाटील दत्ताराम माळी यांच्या तक्रारीनुसार उरळ पोलिसांनी भादंवि कलम ३0२, ४५२, १२0 ब (३४) नुसार दाखल करून आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात तिसरे जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. अखेर न्यायालयाने तीनही आरोपींना भादंवि कलम ३0२ सहकलम १२0 ब नुसार फाशीची शिक्षा सुनावली व प्रत्येकी १0 हजार रुपये दंड सुनावला. दंड न भरल्यास एक सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी विधिज्ञ अ‍ॅड. गिरीश देशपांडे यांनी बाजू मांडली. 

बचाव पक्षाने केली आरोपींवर दयेची याचनायुक्तिवाद करताना बचाव पक्षाने आरोपींचे वय लक्षात घेता, त्यांच्यावर दया दाखवावी आणि त्यांना फाशीची शिक्षा देऊ नये, अशी याचना केली; परंतु ही याचना न्यायालयाने फेटाळून लावली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय