पातूर (जि. अकोला): आशीर्वाद ढाब्यावरील संजय पाचपोर यांच्यावर दोन अज्ञात इसमांनी २३ जूनच्या रात्री चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी भाजपाचे पदाधिकारी चंद्रकांत अंधारे उर्फ टिल्लू पाटील यांना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेमुळे राजकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली होती. आज त्यांना पातूर येथील न्यायालयात हजर केले असता त्यांची मंगळवारी जामिनावर मुक्तता करण्यात आली. यावेळी चंद्रकांत अंधारे यांच्याकडून अँड. मोहन मोयल,अँड. शारीक ऊर रहेमान यांनी काम पाहिले. सुनावणीच्या दरम्यान पातूर न्यायालयामध्ये अभूतपूर्व गर्दीचे दर्शन दिसून आले.
ढाब्यावरील हल्लाप्रकरणी भाजपाच्या पदाधिका-यास जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 02:09 IST