अकोला - प्रवाश्याची बॅग चोरणाऱ्या आॅटोचालकास खदान पोलिसांनी सोमवारी अटक केली. या आॅटोचालकाकडून चोरीतील दोन मोबाईलसह सोनसाखळी व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर चोरटयास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली आहे.आॅटोचालक संजय बाबाराव तायडे हा खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रवाश्यांच्या बॅग चोरी करीत असल्याची माहिती खदानचे ठाणेदार अनील जुमळे यांना मिळाली. त्यांनी आॅटोचालक संजय तायडे याला ताब्यात घेउन चौकशी केली असता त्याने प्रवाश्याची बॅग चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सोनसाखळी, मोबाईल व चोरी केलेली बॅग जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे यांच्या मार्गदशनात राजेन्द्र तलेगोटे, मतिन देशमुख, खुशाल नेमाडे, कपिल राठोड़ यांनी केली.
बॅग चोरणारा आॅटोचालक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 16:02 IST