शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमले रेल्वे स्थानक

By admin | Updated: July 4, 2014 00:45 IST

शेकडो वारकरी पंढरपूरला रवाना

अकोल : विठ्ठल दर्शनाची आस मनी धरून, विठ्ठल नामाचा जयघोष करणार्‍या वारकर्‍यांना घेऊन गुरुवारी अकोला रेल्वे स्थानकावरून विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस पंढरपूरकडे रवाना झाली. वारकर्‍यांच्या विठ्ठल नामाच्या जयघोषामुळे रेल्वे स्थानकाचा परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते. पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने दरवर्षी अमरावती ते पंढरपूरदरम्यान विशेष गाडी सोडण्यात येते. यंदादेखील रेल्वे प्रशासनाच्यावतीने विशेष गाडीची व्यवस्था करण्यात आली असून, तिच्या पहिल्या फेरीला गुरुवार ३ जुलै रोजी प्रारंभ झाला. अमरावती तथा अकोला रेल्वे स्थानकावरून बसलेल्या वारकर्‍यांचे स्वागत व सत्कार मोठय़ा उत्साहत अकोला रेल्वे स्थानकावर करण्यात आला. विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस दुपारी ४.१५ च्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकावरील पहिल्या क्रमांकाच्या फलाटावर पोहोचली. याप्रसंगी उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड यांनी इंजीनची विधिवत पूजा करून इंजीन ड्रायव्हर आशीष श्रीवास्तव व अतुल लोणसने यांच्यासह स्टेशन प्रबंधक बी. पी. गुजर यांचा स्तकार केला. यावेळी त्यांच्यासोबत श्रीराम मोरवाल, विदर्भ वारकरी संघटनेचे मधुकर रुदानकर, वासुदेव बेंडे, सचिन पाटील, रवींद्र दुतोंडे, प्रल्हाद ढोरे, अशोक रुदानकर, बलिराम क्षीरसागर, गणेश चिंतामणे, सतीष वानखडे, वसंता अलोणे आदी उपस्थित होते. दरम्यान, फलटांवर खाद्य पदार्थांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांमार्फत वारकर्‍यांना अल्पोपाहार वितरित करण्यात आला. गाडीला ५ सामान्य, १ शयन यान, १ वातानुकूलित आणि १ एसएलआर डबे राहणार आहेत. ही विशेष गाडी ३ जुलैव्यतिरिक्त ४, ६ व ७ जुलैलादेखील अमरावतीवरून पंढरपूरकडे रवाना होणार आहे. तसेच ५, ६, ११ व १२ ला पंढरपूरवरून अमरावतीकडे परतेल. पंढरपूरकडे जाणारी ही विशेष गाडी दुपारी ४.१५ वाजता तर पंढरपूरवरून अमरावतीकडे परतणारी गाडी सकाळी ८ वाजता अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. सामान्य यात्रेकरूंना १२0 रुपये, तर शयनयानसाठी ३६0 रुपये प्रवाशांना अदा करावे लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.