शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Bachchu Kadu: "पुढची सत्ता प्रहारची...", बच्चू कडूंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 12:48 IST

Bachchu Kadu: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतराचे वारे सुरू झाले आहे. मात्र, दुसरीकडे कायद्याचा व नियमांचा आधार घेत बंडखोरांची कोंडी करण्याचा प्रयत्न सरकार पक्षाकडून होत आहे.

- राजेश शेगोकार  अकोला : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतराचे वारे सुरू झाले आहे. मात्र, दुसरीकडे कायद्याचा व नियमांचा आधार घेत बंडखोरांची कोंडी करण्याचा प्रयत्न सरकार पक्षाकडून होत आहे. त्यांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली नाही, तर या गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागेल. अशावेळी भाजप आणि प्रहार हे दोनच पर्याय बंडखोरांकडे आहेत. या पृष्ठभूमीवर चार दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी, ‘पुढची सत्ता प्रहारची, मुख्यमंत्री आमचाच,’ असे विधान केले होते. तो व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्या दिवसापासून बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार जनशक्ती पक्ष आहे. या पक्षाचे आमदार राजकुमार पटेल हे शिंदे यांच्यासोबत सुरत येथे पोहोचले होते,  दुसऱ्या दिवशी कडू सहभागी झाले. ‘आपण  एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत,’ असे यापूर्वीच कडू यांनी जाहीर केले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशी  कडू यांनी माध्यमांसोबत  बोलताना आता अपक्षांना चांगले दिवस येतील, लवकरच आमची सत्ता येईल, पुढचा मुख्यमंत्री ‘प्रहार’चाच राहील, असे विधान केले होते. बच्चू कडू यांचे हे विधान मिश्कील असल्याची चर्चा त्यावेळी झाली. या विधानाला राजकीयदृष्ट्या गांभीर्याने घेतले गेले नाही. मात्र, सध्याच्या पेचप्रसंगात प्रहार जनशक्ती पक्ष हा शिंदे गटाकडे असलेला पर्याय पाहता बच्चू कडू यांना या बंडाची पूर्वकल्पना होती, अशी शंका उपस्थित होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असलेल्या आमदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली नाही, तर त्यांना भाजपात विलीन व्हावे लागेल. भाजपमध्ये विलीन होणे हे शिंदे यांना राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. ‘मी शिवसेनेचाच’ असे आजही ते ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे आमदारकी वाचविण्यासाठी तसेच राज्यातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी शिंदे यांच्यासमोर प्रहार जनशक्ती या पक्षाचा विश्वासू पर्याय शिल्लक राहतो.  

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAkolaअकोला