शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Ayodhya Verdict : सन्मान, संयम, शांतता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:11 IST

सामाजिक सलोखा अन् सौहार्द कायम ठेवत दिवसभरात कुठेही प्रत्यक्ष किंवा समाज माध्यामांवरही टीका-टिपणी उमटली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला जिल्ह्यात अयोध्या निकालाचा सन्मान ठेवत नागरिकांनी अभूतपूर्व संयम दाखवित शांतता कायम ठेवली. सामाजिक सलोखा अन् सौहार्द कायम ठेवत दिवसभरात कुठेही प्रत्यक्ष किंवा समाज माध्यामांवरही टीका-टिपणी उमटली नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शनिवारी बहुचर्चित अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर केला. निकालानंतर जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. अकोला शहरासह, जिल्हाभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, यासोबतच पोलीस, राजकीय पुढारी तसेच सामाजिक संघटनांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर जिल्ह्यात शांततेचे वातावरण आहे. जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आली असून, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी शहरातील पोलीस ठाण्यांसह ग्रामीण भागातील पोलीस ठाणे तसेच संवेदनशील ठिकाणांवर भेटी देऊन तपासणी केली. जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच ठाणेदार, पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कडेकोट बंदोबस्त तैनातजिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात एसआरपीएफ प्लाटून, ५ आरपीसी प्लाटून, १ क्यूआरटी प्लाटून, १ हजारावर होमगार्ड, ३१ स्ट्रायकिंग फोर्स, एलसीबी, डीएसबी यांच्यासह पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कुठल्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्तजिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, अकोट, मूर्तिजापूर या ठिकाणी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

शांतता समितीची घेतली बैठकशहरात कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षकांनी शनिवारी शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी काही सदस्यांनी सोशल मीडियावर तसेच समाजकंटकांवर लक्ष ठेवावे तसेच कोणीही फटाके फोडणार नाही, याबाबत दक्षता घेतली जावी, असे सांगितले.शाळा-महाविद्यालयांना सुटी नाहीराज्यातील अनेक जिल्ह्यासह बुलडाणा व वाशिममध्येही शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे; मात्र सलोख्याच्या वातावरणात या निर्णयाचा सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया सकारात्मक असून, कुणालाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेणार असल्याचे नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सांगितल्यानंतर त्यांनी शाळा-महाविद्यालयांना सुटी दिली नाही.

टॅग्स :AkolaअकोलाAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर