शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोरिक्षाची चाके थांबल्याने चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 10:44 IST

. संचारबंदी काळात दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे ऑटो चालक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गत २२ दिवसांपासून संचारबंदी आहे. या काळात रेल्वे, बसगाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशीच नसल्यामुळे ऑटोरिक्षांची चाकेसुद्धा थांबली आहेत. पोलीस वाहतूक शाखेच्या माहितीनुसार शहरात ४ हजारांवर परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. सध्या शहरातील रस्त्यांवर एकही ऑटोरिक्षा धावत नसल्याने, ऑटोरिक्षा चालकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. संचारबंदी काळात दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे ऑटो चालक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसागणिक वाढत आहे. शासनाने २२ मार्चपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असून, नागरिकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे रेल्वे, बससेवासुद्धा बंद आहे. गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, या दृष्टिकोनातून रेल्वे व परिवहन विभागाला सेवा बंद ठेवाव्या लागत आहेत.रेल्वे स्थानक, बसस्थानकावर प्रवासी नसल्यामुळे आणि नागरिकांचे बाहेर पडणे बंद असल्याने, ऑटोरिक्षांची चाकेसुद्धा थांबली आहेत. एक ऑटोरिक्षा चालकाला दररोज ५00 ते ८00 रुपये रोजगार मिळायचा. यातून मुलांचेशिक्षण, घरखर्च भागायचा; परंतु आता हा रोजगारच बुडाला असल्याने आणि उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्यामुळे ऑटोरिक्षा चालकांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, याची चिंता आॅटोरिक्षा चालकांना सतावत आहे. कोरोनामुळे ऑटोरिक्षा चालकांना चांगलाच फटका बसला आहे. गत २२ दिवसांपासून घरांसमोर आॅटोरिक्षा उभ्या आहेत. घरात दुसरे कोणी कमावणारे नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची मोठी आबाळ होत आहे. अशा संकटकाळात करावे काय, असा प्रश्न आॅटोरिक्षा चालकांसमोर उभा राहिला आहे. प्रशासनाने परवानाधारक आॅटोरिक्षा चालकांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आॅटोरिक्षा चालकांनी केली आहे.  

शाळा बंद तर ऑटो बंद!अकोला शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे सातशेच्यावर आॅटोरिक्षा चालक आहेत; परंतु शाळा, महाविद्यालयांना अचानक सुट्या देण्यात आल्यामुळे या ऑटोरिक्षा चालकांसमोरसुद्धा रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व चालकांचे  ऑटो घरासमोर उभे राहिल्याने महिन्याकाठी ८ ते १0 हजार रुपये येणारा रोजगार बंद झाला आहे.कोरोनाच्या संचारबंदीमुळे आम्हा ऑटोरिक्षा चालकांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. महागाईच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याचा प्रश्न आहे. ४ हजारांवर कुटुंबांचा ऑटोरिक्षाच्या भरवशावर संसार चालतो. पैसाच नसल्यामुळे घर कसे चालवावे, याची चिंता आहे. यातून प्रशासनाने काहीतरी मार्ग काढावा.-उमेशचंद्र शर्मा,अध्यक्ष, शहर ऑटोरिक्षा चालक संघटना.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस