शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकावर होतो लिलाव; प्रवासी लावतो बोली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 15:26 IST

बसस्थानकावर होणाऱ्या लिलावात बसस्थानकावर जमलेले प्रवासी बोली लावतात. अंतिम बोलीत टिकलेल्या व्यक्तीच्या (प्रवाशाच्या) स्वाधीन संबंधित वस्तू केली जाते.

- संजय खांडेकरअकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रत्येक डेपोवर अधून-मधून जाहीर लिलाव होत असतो; मात्र या लिलावाची माहिती किती जणांना आहे, कुणास ठाऊक; पण ही पद्धत न्यायिक आणि लोकाभिमुखासोबतचं स्वागतार्हच म्हणावी लागेल. बसस्थानकावर होणाऱ्या लिलावात बसस्थानकावर जमलेले प्रवासी बोली लावतात. अंतिम बोलीत टिकलेल्या व्यक्तीच्या (प्रवाशाच्या) स्वाधीन संबंधित वस्तू केली जाते.महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. प्रवास करीत असताना, कुणी बॅग, सुटकेस, विविध साहित्य, छत्री, दागिने, घड्याळ, कपडे आणि वस्तू विसरून जातात. अनेकजण हरविलेल्या वस्तूंचा शोध घेतात, तर काही घेत नाहीत. मग, या वस्तू या बसगाडीचे वाहक थेट संबंधित डेपोत जमा करतात. डेपोत या बॅगमधील प्रत्येक वस्तूंची बारीकसारीक नोंद कागदावर घेतली जाते आणि ती बॅग, वस्तू डेपोत पेटीबंद होते. त्यानंतर काही कालावधीत या सर्व वस्तू बसस्थानकावर मांडून त्यांचा जाहीर लिलाव केला जातो. याप्रसंगी एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित असतात.

काय आहे हा प्रकार ...महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हजारो बसगाड्या राज्य आणि राज्याच्या बाहेर दररोज ये-जा करीत असतात. या बसगाड्यांमध्ये अनेकदा प्रवासी आपले साहित्य, बॅग, वस्तू विसरून जातात. बेवारस म्हणून बसमध्ये सापडलेल्या या वस्तूंची नियमानुसार नोंद केली जाते. त्यानंतर महामंडळाचे अधिकारी वरिष्ठांसमोर या वस्तूंचा जाहीरपणे लिलाव करतात. त्या वस्तूंची विल्हेवाट लावली जाते. लिलावातून गोळा झालेली रक्कम एसटी महामंडळाच्या महसुलात जमा केली जाते. दंड भरून मिळू शकते वस्तूमहामंडळाच्या बसगाडीत प्रवास करीत असताना जर बॅग किंवा काही वस्तू हरविली तर प्रवासादरम्यानच्या डेपोत जाऊन चौकशी केली पाहिजे. प्रत्येक डेपोत एक सामान पेटी ठेवलेली असते. ओळख पटवून ही वस्तू मिळविता येते; मात्र त्यासाठी नाममात्र दंड भरावा लागतो. 

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटीAkola Bus Standअकोला बस स्थानक