शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर चक्रभुंगा, तंबाखुची पाने खाणाऱ्या अळीचे आक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:38 IST

विदर्भातील सोयाबीन पिकावर चक्रभुंगा व तंबाखुची पाने खाणाºया अळीने आक्रमण केले आहे.

अकोला : मागील १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण व तुरळक स्वरू पाचा पाऊस सुरू असून, हे वातावरण पिकावरील कीड,अळींना पोषक ठरत असल्याने विदर्भातील सोयाबीन पिकावर चक्रभुंगा व तंबाखुची पाने खाणाºया अळीने आक्रमण केले आहे. या वातावरणात किडीचे व्यवस्थापन करता येत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे.विदर्भात यावर्षी मान्सून उशिरा पोहोचला, असे असले तरी १६ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. पेरणीनंतर चार आठवडे पावसाने दडी मारली. २६ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली. तथापि, पावसात दम नाही; परंतु सतत ढगाळ वातावरण असून, काही भागात तुरळक तर काही ठिकाणी फवारणीसारखा पाऊस होत आहे. यामुळे पिकांचे व्यवस्थापन करण्यात अडचण येत आहे. तणनाशक किंवा कीटकनाशक फवारणी केल्यावर किमान सहा तास पाऊस नको. तथापि, त्यावर लगेच फवारणीसारखा पाऊस पडत असून, फवारलेले रसायन, कीटकनाशक कुचकामी ठरत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. परिणामी, सोयाबीनवर चक्रभुंगा, खोडमाशी तर काही ठिकाणी हिरवी व तंबाखुचे पाने खाणाºया अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अळ््या व कीड आणखी वाढण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.

- सोयाबीनवर चक्रभुंगा व खोडमाशी आली आहे. याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जात असून, शिफारशीप्रमाणे कीटकनाशके फवारणी करण्याचा सल्ला दिला जात आहे.डॉ.अनिल कोल्हे,मुख्य बीज संरक्षण अधिकारी,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी