लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर परिसरा तील एका पाणीपुरी विक्रेत्याने एका युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या हल्ल्यात सदर युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विद्यानगर परिसरात गोलू नामक युवक पाणीपुरीची गाडी लावतो. शनिवारी रात्री या ठिकाणी विश्वास वाकोडे नामक युवक पाणी पुरी खाण्यासाठी आला. दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाले. वाद वाढत गेल्याने त्याचे परिणाम हाणामारीत झाले. हाणामारी सुरू असतानाच गोलूने पाणीपुरीच्या गाडीवरील कांदा कापण्याच्या चाकू घेऊन विश्वास वाकोडे या युवकावर सपासप हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात वाकोडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी ताफ्यासह धाव घेतली. त्यानंतर सदर जखमीस रुग्णालयात दा खल करून त्यांच्या तक्रारीवरून गोलूविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गोलू फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पाणीपुरी विक्रेत्याचा ग्राहकावर धारदार शस्त्रांनी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 19:36 IST
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर परिसरा तील एका पाणीपुरी विक्रेत्याने एका युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या हल्ल्यात सदर युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाणीपुरी विक्रेत्याचा ग्राहकावर धारदार शस्त्रांनी हल्ला
ठळक मुद्देयुवकाची प्रकृती गंभीर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल