शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

महिलांवरील अत्याचार थांबता थांबेना; वर्षभरात ६९ बलात्कार; १९९ विवाहित महिलांचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 15:22 IST

अकोला : जिल्ह्यात गत एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ६९ युवतींवर बलात्कार करण्यात आला असून, तब्बल १९९ विवाहित महिलांचा छळ झाल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.

ठळक मुद्दे १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ६९ महिला, युवती व अल्पवयीन मुलींवर अत्याचार. विवाहित असलेल्या १८५ महिलांचा सासरच्या मंडळीकडून विविध कारणांसाठी शारीरिक व मानसिक छळ झाल्याचे हृदयद्रावक वास्तव आहे.यासोबतच जिल्ह्यातील नऊ विवाहित महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांची हत्या झाल्याचेही आकडेवारीवरून समोर आले आहे.

- सचिन राऊत,अकोला: महिलांवर होणाºया अत्याचाराला आळा घालण्यासाठी कायद्यात अनेक दुरुस्त्या करून कठोर कायदा करण्यात येत असला, तरीही विकृत मनोवृत्तीवर उपाय नसल्याने अकोला जिल्ह्यातच नव्हे, तर देशभर महिला अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. एकट्या अकोला जिल्ह्यात गत एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ६९ युवतींवर बलात्कार करण्यात आला असून, तब्बल १९९ विवाहित महिलांचा छळ झाल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.अकोला जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांतर्गत १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ६९ महिला, युवती व अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांच्यावर जबरी संभोग करण्यात आला आहे. तर विवाहित असलेल्या १८५ महिलांचा सासरच्या मंडळीकडून विविध कारणांसाठी शारीरिक व मानसिक छळ झाल्याचे हृदयद्रावक वास्तव आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ विवाहित महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांची हत्या झाल्याचेही आकडेवारीवरून समोर आले आहे. पाच विवाहित महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहे. यावरून महिलांवर अत्याचार करणाºयांच्या मुसक्या आवळण्यासाठी होणारे प्रयत्न अद्यापही तुटपुंजेच असल्याचे दिसून येत आहे. महिलांसोबतच लहान मुलींवर अत्याचार झाल्याची प्रकरणेही समोर आली असून, त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. एक महिन्यात १० बलात्कार१ ते ३१ जानेवारी २०१८ या एक महिन्यात तब्बल १० मुलींवर बलात्कार झाल्याचे वास्तव आहे, तर तीन विवाहित महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांचा बळी घेण्यात आला आहे. नऊ महिलांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले आहे. यावरून या वर्षामध्येही शारीरिक व मानसिक छळासोबतच महिलांचे चार भिंतीच्या आत छळाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

 कायद्याचा गैरवापरही धोक्याचाकाही महिलांकडून कठोर कायद्याचा गैरवापर करण्यात येत असल्याचेही खळबळजनक वास्तव आहे. सिंधी कॅम्पमधीलच एका युवकाचा अशाच प्रकरणात बळी गेल्याचे उदाहरण ताजे आहे. यावरून महिला व युवती कुणाच्याही बोलण्यात येऊन विनयभंग व बलात्काराची खोटी तक्रार देण्याचे प्रमाणही वाढल्याचे पोलीस अधिकाºयांचे म्हणणे आहे. यामध्ये बहुतांश वेळा कायद्याचा गैरवापर करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाWomen's Day 2018महिला दिन २०१८