अकोला: रेल्वेतील प्रवाशांचे मोबाइल चोरणार्या अट्टल चोरट्यास अकोला आरपीएफने मंगळवारी अटक केली. या चारेट्याकडून तीन मोबाइल जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आसाम या राज्यातील रहिवासी असलेला तसेच सध्या विदर्भात विविध रेल्वेमधील प्रवाशांचे मोबाइल पळविणार्या मो. अब्दुस सलाम (२0) याला आरपीएफ पोलिसांनी मंगळवारी संशयावरून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने रेल्वेमध्ये अनेकांचे मोबाइल चोरल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून तीन मोबाइल जप्त केले आहेत. यामधील एक मोबाइल जुने शहरातील आशीष शेळके नामक युवकाचा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सदर आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला जीआरपीच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे.
आसाममधील अट्टल चोरटा जेरबंद
By admin | Updated: August 3, 2016 02:13 IST