शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस ठाण्यांची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 13:39 IST

अकोला: अमरावती परिक्षेत्राच्या विविध जिल्ह्यातून अकोला पोलीस दलात दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना ठाणेदार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अकोला: अमरावती परिक्षेत्राच्या विविध जिल्ह्यातून अकोला पोलीस दलात दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना ठाणेदार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी ही यादी शुक्रवारी काढली असून, त्यांना तातडीने रुजू होण्याचा आदेश देण्यात आला आहे.अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी काही दिवसांपूर्वी अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. गुरुवारी काढलेल्या आदेशान्वये जिल्ह्यातील पाच सहायक पोलीस निरीक्षकांना विविध पोलीस ठाण्यात रुजू होण्याचा आदेश दिला आहे. तर दोन पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. अकोला पोलीस दलात कार्यरत झालेले शैलेश लहुजी ठाकरे यांच्याकडे सायबर पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक महादेव नामदेव पडघन यांच्याकडे बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया वाडेगाव दूरक्षेत्र प्रभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे. नियंत्रण कक्षात दाखल झालेले धीरज दत्तात्रय चव्हाण यांना अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे. बुलडाणा येथून केंद्र नियंत्रण कक्षात दाखल झालेले आशीष मधुकर लव्हंगळे यांची हिवरखेड पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी बदली करण्यात आली आहे. तर वाशिम येथून आलेले रहीम शेख गफार यांची मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार बदली करण्यात आली आहे.प्रमोद काळे यांना पदोन्नतीजिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले तसेच अभ्यासू पोलीस निरीक्षक म्हणून ओळख असलेल्या प्रमोद काळे यांना पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी त्यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक पदाची जबाबदारी दिली आहे. काळे यांचा सेवाकाळ कमीच राहिला असल्याने त्यांची जिल्ह्याबाहेरही बदली करण्यात आली नाही. दोन उपनिरीक्षकांच्या बदल्याशहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकामध्ये चांगली कामगिरी करणारे पोलीस उपनिरीक्षक तुषार नेवारे यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कामकाजामुळे त्यांना या ठिकाणी बदली देण्यात आली, तर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील अनुराधा पाटेखेडे यांची आकोट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस