शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

२४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 14:22 IST

शनिवारपर्यंत जिल्ह्यातील २४ हजार ३३४ शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी तिसºया टप्प्यात प्राप्त झालेली मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, शनिवारपर्यंत जिल्ह्यातील २४ हजार ३३४ शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे.अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्याच्या तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांची मदत शासनामार्फत १ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमार्फत बँकांमध्ये जमा करण्यात आले असून, मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये शनिवार, १५ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २४ हजार ३३४ शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात ३ हजार ९८६, बार्शीटाकळी तालुक्यात ४ हजार ४९०, अकोट तालुक्यात ३ हजार २०, तेल्हारा तालुक्यात ६ हजार १५३, बाळापूर तालुक्यात ४ हजार ९५६, पातूर तालुक्यात १ हजार ३५३ व मूर्तिजापूर तालुक्यात ३७६ शेतकºयांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी