युवकावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 15:16 IST
Crime News एका युवकावर डाबकी रोड परिसरात प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
युवकावर प्राणघातक हल्ला
अकोला : खैर मोहम्मद प्लॉटमधील सैलानी नगरातील रहिवासी असलेल्या एका युवकावर डाबकी रोड परिसरात प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकास नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. युवकाकडिल मोबाईल गहाळ असल्याने पोलिसांनी चोरट्यांचा व हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी शेख असिफ शेख हरून वय 36 वर्ष हे डाबकी रोड वर गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून शेख असिफ यास उपचारासाठी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात पाठवले मात्र प्रकृती गंभीर असल्याने युवकास नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावर शोध घेतला असता यांचा मोबाईल गहाळ असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केला आहे.