शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मद्यसम्राटाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

अकोला : शहरासह जिल्ह्यात मद्यसम्राट म्हणून ओळख असलेल्या राजू जयस्वाल याने पूर्वीच्या मित्रावरच संतापात अश्लील शिवीगाळ करून लोखंडी पाइपने ...

अकोला : शहरासह जिल्ह्यात मद्यसम्राट म्हणून ओळख असलेल्या राजू जयस्वाल याने पूर्वीच्या मित्रावरच संतापात अश्लील शिवीगाळ करून लोखंडी पाइपने हल्ला केल्याची घटना दाेन दिवसांपूर्वी घडली. सुरुवातीला हे प्रकरण आपसात मिटविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र सिव्हिल लाइन्स पाेलिसांनी या प्रकरणात जयस्वाल यांच्याविरुद्ध मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

जठारपेठ परिसरातील रहिवासी जॉय जॉन व राजू जयस्वाल यांची अनेक वर्षांपासून मैत्री आहे. मात्र आरोपी राजेंद्र जयस्वाल याने पाच वर्षांपूर्वी दोन नंबरचा व्यवसाय करण्याचे सांगितले होते. या व्यवसायाला विराेध केल्याने त्याचाच राग मनात ठेवून राजू जयस्वाल यांनी जाॅय जाॅन यांच्यावर ११ जुलैच्या रात्री लाेखंडी पाइपने हल्ला चढविला. जाॅय जाॅन हे त्यांचा मित्र आशिष देवकर यांच्यासाेबत उभे असताना राजू जयस्वाल त्या ठिकाणी आले व जॉय जॉन यांना अश्लील शिवीगाळ करत लोखंडी पाइपने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जॉय जॉन यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.