शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आसीफ खान हत्याकांडातील दोघांचा जामीन अर्ज फेटाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:09 IST

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच आसीफ खान मुस्तफा खान हत्याकांड प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असून, त्यांच्या न्यायालयाने दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला असून, एका आरोपीस जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अकोला : वाडेगावचे माजी सरपंच आसीफ खान मुस्तफा खान हत्याकांड प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असून, त्यांच्या न्यायालयाने दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला असून, एका आरोपीस जामीन मंजूर करण्यात आला आहे.वाशिम जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष ज्योती गणेशपुरे हिने आसीफ खान यांची हत्या घडवून आणण्याचा कट काजळेश्वर येथे १५ आॅगस्ट रोजी सकाळी रचल्यानंतर १६ आॅगस्ट रोजी ज्योती गणेशपुरेने आसीफ खान यांना मूर्तिजापूर येथे बोलावले व त्यानंतर त्यांना सोबत घेऊन दर्यापूर तालुक्यातील आमला या ठिकाणी बहीण संगीता वानखडे हिच्या घरी नेले होते. या ठिकाणावर काजळेश्वर येथील रहिवासी रामदास पखाले, अशोक साबणकर, मोहम्मद वारीस शेख हुसेन, स्वप्निल वानखडे, वैभव गणेशपुरे व ज्योती गणेशपुरे यांनी आसीफ खान यांची हत्या केली होती. त्यावेळी झालेल्या झटापटीत ज्योती गणेशपुरेला चाकू लागल्याने ती जखमी झाली होती. आसीफ खान यांचा मृत्यू झाल्यानंतर सदर आरोपींनी त्यांचा मृतदेह कारमध्ये टाकला व म्हैसांगच्या पुलावरून कार नदीत लोटण्याचा प्रयत्न केला; मात्र कार झाडात अडकल्याने त्यांचा कट अयशस्वी होत असल्याचे दिसताच त्यांनी आसीफ खानचा मृतदेह नदीत फेकला होता. आसीफ खान बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मुलगा सोहेल खान यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मूर्तिजापूर पोलिसांकडे या गुन्ह्याचा तपास दिल्यानंतर त्यांनी तपास करून आरोपींना अटक केली. सदर आरोपी कारागृहात असून, त्यांनी दोषारोपपत्र दाखल होताच जामिनासाठी धावपळ सुरू केली आहे. यामधील स्वप्निल वानखडे, अशोक साबणकर व मोहम्मद वारीस शेख हुसेन या तीन आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून, साबणकर व वानखडे या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला असून, मो. वारीस शेख हुसेन यास जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय