शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

भारिप-बमसंच्या प्रदेशाध्यक्षपदी अशोक सोनोने यांची निवड; अकोल, बुलडाणा जिल्हयात येणार नवे चेहरे!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:51 AM

अकोला : भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी अशोक सोनोने यांची निवड करण्यात आली असून, अकोल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार यांचा प्रदेश कार्यकारिणीत सल्लागार म्हणून समावेश करण्यात आहे. अकोल्यातील माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी आमदार हरिदास भदे यांचाही प्रदेश कार्यकारिणीत समावेश झाला आहे. अकोला व बुलडणा जिल्हाध्यक्षांचा प्रदेश कार्यकारिणीत समावेश झाल्याने या दोन जिल्हयाला नवे चेहरे मिळणार आहेत.

ठळक मुद्देबळीराम सिरस्कार - सल्लागार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी अशोक सोनोने यांची निवड करण्यात आली असून, अकोल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार यांचा प्रदेश कार्यकारिणीत सल्लागार म्हणून समावेश करण्यात आहे. अकोल्यातील माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी आमदार हरिदास भदे यांचाही प्रदेश कार्यकारिणीत समावेश झाला आहे. अकोला व बुलडणा जिल्हाध्यक्षांचा प्रदेश कार्यकारिणीत समावेश झाल्याने या दोन जिल्हयाला नवे चेहरे मिळणार आहेत.भारिप-बमसंच्या प्रदेश कार्यकारिणीचे गठन गेल्या अनेक वर्षांपासून झाले नाही. त्यामध्ये असलेल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकाही क्वचितच झाल्या. आधीच्या कार्यकारिणीत अकोल्यातील डी.एन. खंडारे, दिलीप तायडे यांचा समावेश होता. मात्र, कार्यकारिणीची बैठकच होत नसल्याने नवीन रचना करण्याची मागणीही सातत्याने पुढे आली. दरम्यान, २0१४ नंतर निवडणूक विषय मागे पडला. आता २0१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे पक्षाचे कामही वेगात येणार आहे. त्यापूर्वी पक्षाची प्रदेश कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी बुलडाणा जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने (खामगाव) यांची नियुक्ती झाली. महासचिवपदी औरंगाबादचे अमित भुईगळ, कुशल मेश्राम, मार्गदर्शक मंडळामध्ये पक्षाचे कार्यालयीन सचिव ज.वि. पवार, आमदार बळीराम सिरस्कार, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी आमदार हरिदास भदे यांचा समावेश आहे. कोषाध्यक्षपदी मनोहर सोनवणे, तर पक्षाच्या विद्वत सभेमध्ये पुणे येथील प्राचार्य म.ना. कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. 

बिनकामाच्या प्रभारामुळे अडचणभारिप-बमसंच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकाच होत नसल्याचा यापूर्वीच्या पदाधिकार्‍यांचा अनुभव आहे. त्यामुळे ते पदाधिकारी धड प्रदेशचे नाहीत, तर धड जिल्ह्याचेही राहत नाहीत. जिल्ह्यातील कार्यकर्तेही त्यांना विचारत नाहीत. हा अनुभव आल्याने गेल्या काळात काहींना नैराश्यही आले होते. 

जिल्हा कार्यकारिणीवर प्रश्नचिन्हपक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त समजल्या जातात. मात्र, भारिप-बमसंमध्ये तसे घडत नाही. तरीही येत्या काळात जिल्हा कार्यकारिणीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष सोनोने, मार्गदर्शकांमध्ये आमदार सिरस्कार यांचा समावेश झाल्याने त्यांची जिल्हाध्यक्ष पदे रिक्त झाली आहेत. त्या पदांवर नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार की रिक्त ठेवली जाणार, याबाबत आता कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघBaliram Siraskarबळीराम सिरस्कार