शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शहराची स्वच्छता होत नसल्याने, महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी! कचऱ्याचे ढीग दिसले तर थेट निलंबन

By नितिन गव्हाळे | Updated: July 2, 2024 23:41 IST

शहरात स्वच्छता झाली नाही, ढीग आढळून आल्यास स्वच्छता निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा दम भरत त्यांनी, अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

अकोला: गत काही दिवसांपासून शहरात कचऱ्याचे ठिकठिकाणी ढीग दिसत असून, शहराची स्वच्छता कागदावर होत असल्याने, २ जुलै रोजी दुपारी महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी स्वच्छता विभागासह इतरही विभागांची बैठक घेत, स्वच्छतेच्या कामामध्ये कामचुकारपणा किंवा खोटेपणा खपून घेतलाजाणार नाही. शहरात स्वच्छता झाली नाही, ढीग आढळून आल्यास स्वच्छता निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा दम भरत त्यांनी, अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांनी मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागांची पाहणी केली असताना, शहरात मुख्य रस्त्यांच्या कडेला आणि प्रभागातील आतमधल्या खुल्या भुखंडामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग उचलल्याच गेले नसल्याचे उघड झाले. तसेच दैनंदिन होणारे स्वच्छतेच्या कामात दिरंगाई केली जात असून, नाले सफाईचे कामानंतर नाल्यामधून निघालेला गाळ व कचरा नाल्यांच्या कडेला दिसत आहे. याचसोबत शहरात सिंगल युज प्लास्टिकचा सर्रास पणे वापर सुरू असल्याचे मनपा आयुक्त डॉ. लहाने यांनी अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणुन देत, स्वच्छता विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आणि खरमरीत शब्दात अधिकाऱ्यांची खरडपट्टीत काढत, यापुढे रस्त्यांवर कचरा, ढीग दिसले तर थेट निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई कराशहरामधील कचरा टाकण्यात आलेले सर्व ठिकाणे, दोन आठवड्यांत स्वच्छ करा आणि ज्या भागात कचरा आढळून आलेला आहे. त्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना घरात व प्रतिष्ठानात निघणारा कचरा डस्टबीनमध्ये गोळा करून मनपाच्या कचरा घंटा गाडीमध्येच टाकणेसाठी प्रवृत्त करा. त्यानंतरही नागरिक परिसरात, रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.                                                                                                   मलेरिया विभागाकडून फवारणी करून घ्याशहरात नाले सफाईचे काम थातुरमातूर झाल्याचे निदर्शनास आले असून, नाल्यांतील तुंबलेल्या सांडपाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे सर्व स्वच्छता निरीक्षकांनी सर्व नाल्यांची स्वच्छता करावी. सफाई नंतर निघालेला गाळ व कचरा तातडीने उचलावा. तसेच खुल्या भुखंडामध्ये, परिसरात पाण्याचे डबके आढळ्यास मलेरिया विभागाकडून डांसअळी फवारणी करून घ्यावी. असेही निर्देश आयुक्त डॉ. लहाने यांनी दिले. बैठकीला मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्यासह अधिकारी, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न