शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात फिरकलेच नाहीत; अरविंद सावंत यांची उपमुख्यमंत्र्यांवर टीका

By आशीष गावंडे | Updated: April 11, 2023 18:38 IST

पालकमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्यात फिरकलेच नाहीत अशी टीका अरविंद सावंत यांनी केली. 

अकोला: जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. बाळापुर तालुक्यातील पारस येथे मंदिरात आरती करणाऱ्या भाविकांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार तथा विदर्भाचे संपर्कप्रमुख, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी केली. 

जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघात पारस येथे मंदिरामध्ये आरती सुरू असताना मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे भाविकांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे सात भाविकांचा मृत्यू झाला. यापैकी अनेक जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी शिवसेनेचे खासदार तथा विदर्भाचे संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृती बद्दल विचारणा केली. यावेळी उपस्थित पत्रकारांसोबत संवाद साधला असता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. 

अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. पारस येथील दुर्दैवी घटना घडल्यानंतरही राज्यकर्त्यांनी केवळ भ्रमणध्वनीद्वारे शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे अरविंद सावंत यावेळी म्हणाले. त्यांच्यासोबत जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रकाश शिरवाडकर, शहर प्रमुख (अकोला पश्चिम) राजेश मिश्रा, शहर प्रमुख (अकोला पूर्व) राहुल कराळे,  अतुल पवनीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

फडणवीस अमरावतीमध्ये आले, मग अकोल्यात का नाही?शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अमरावती येथे पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोमवारी उपस्थिती लावली. फडणवीस यांच्याकडे अकोल्याचे पालकत्व असताना ते अकोल्यात का आले नाहीत, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसArvind Sawantअरविंद सावंत