शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?

By आशीष गावंडे | Updated: October 7, 2024 22:07 IST

वाहनांची जाळपोळ; जुने शहरातील हरिहर पेठमध्ये तणावसदृश्य स्थिती.

आशिष गावंडे/अकोला

अकोला: जुने शहरातील हरिहर पेठ भागात ऑटोचा एका दुचाकीस्वाराला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन समुदायात दगडफेकीची घटना सोमवारी सायंकाळी ४.४७ वाजताच्या सुमारास गाडगेबाबा चौकात घडली. यावेळी काही समाजकंटकांनी ऑटोसह दोन दुचाकी वाहनांची जाळपोळ केली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. 

जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हरिहर पेठ भागातील संत गाडगेबाबा चौकात एका दुचाकीस्वाराला ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद निर्माण झाला. हा वाद आपसात मिटविण्यात आल्यानंतर लगेच एका समुदायाने काही क्षणाच्या आत दुसऱ्या समुदायातील मुले व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी किराणा दुकानात आलेल्या महिलांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात महिलांची धावपळ सुरू झाली. दगडफेक होत असल्याचे पाहून संरक्षणासाठी दुसऱ्या समुदायातील मुले रस्त्यावर उतरली व त्यांनीही प्रतिस्पर्ध्यांवर दगडफेक सुरू केली. यादरम्यान, अज्ञात इसमाने घटनास्थळावरील ऑटो व काही दुचाकींना आग लावल्याने ही वाहने आगीच्या भक्षस्थानी पडली. दगडफेकीची घटना हरिहर पेठ भागात वाऱ्यासारखी पसरताच दोन्ही समुदायातील तरुण एकमेकांसमोर उभे ठाकले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्यासह जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. ...................रस्त्यावर दगडांचा खचहरिहर पेठ मधील संत गाडगेबाबा चौक व त्यालगतचा परिसर अतिशय संवेदनशील समजला जातो. नेमका याच ठिकाणी हा वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा दगड  विटांचा अक्षरशः खच साचून असल्याचे दिसून आले. ..................समाजकंटकांचा शोध सुरूदगडफेक करणाऱ्या व वाहनांची जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांचा पोलीस यंत्रणेकडून कसून शोध घेतला जात आहे...........................हरिहर पेठ, शिवसेना वसाहतमध्ये कडेकोट बंदोबस्तजिल्हा पोलीस अधीक्षक सिंह यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा हरिहर पेठ तसेच शिवसेना वसाहतमधील दुर्गा चौक  अंबिकानगर आदी परिसरात तैनात केली आहे. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके, जुने शहरचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर,डाबकी रोडचे पोलीस निरीक्षक धर्मा सोनुने, शहर वाहतूक शाखा प्रमुख सुनील किनगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर तळ ठोकून होते. ............भाजपचे माजी नगरसेवक जखमीहरिहर पेठ मध्ये तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर थोड्याच वेळात शिवसेना वसाहतमधील दुर्गा चौक व अंबिका नगर परिसरात दोन समुदायात दगडफेक सुरू झाली. हा प्रकार थांबविण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेले भाजपाचे माजी नगरसेवक अमोल गोगे जखमी झाले. त्यांच्या डोक्यावर दगड लागल्यामुळे रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. ......................भाजप लोकप्रतिनिधींची हरिहर पेठमध्ये धावघटनेची माहिती मिळताच भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी हरिहर पेठ भागात धाव घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासोबत चर्चा केली तसेच परिसरातील स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधत त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Akolaअकोला