शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांची वाट पाहत आहेत का? - नाना पटोले यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 18:58 IST

अकोला : विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांनी विचलित होणारे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे सरकारवर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची भाषा करत होते. तेच फडणविस आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढे कसे बदलले. शेतकऱ्यांच्या  छोट्या मागण्याही मान्य न करणारे फडणवीस आता शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांची वाट पाहत आहेत का, असा घणाघाती सवाल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मंगळवारी अकोला येथे केला.

ठळक मुद्देअकोल्यात शेतकरी आंदोलनस्थळाला दिली भेट.राज्यसरकार व प्रशासनाचा केला जाहीर धिक्कार.

- अतुल जयस्वाल

अकोला : विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांनी विचलित होणारे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे सरकारवर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची भाषा करत होते. तेच फडणविस आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढे कसे बदलले. शेतकऱ्यांच्या  छोट्या मागण्याही मान्य न करणारे फडणवीस आता शेतकऱ्यांच्या  आत्महत्यांची वाट पाहत आहेत का, असा घणाघाती सवाल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मंगळवारी अकोला येथे केला.शेतकºयांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित आंदोलनाचा भाग म्हणून माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेतकºयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. प्रशासनासोबतची बोलणी फिसकटल्याने निर्धारावर ठाम असलेल्या यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकºयांना पोलिसांनी स्थानबद्ध करून पोलिस मुख्यालयात आणले. रात्रभर या ठिकाणी ठाण मांडून बसलेले यशवंत सिन्हा व शेतकºयांचे आंदोलन मंगळवारी दुसºया दिवशीही सुरुच आहे. या आंदोलन स्थळाला नाना पटोले यांनी दुपारच्या सुमारास भेट देऊन शेतकºयांना संबोधित केले. ते पुढे म्हणाले, आतापर्यंत कोणत्याच सरकारांनी शेतकºयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांच्या  मागण्या या रास्त असतानाही शासन आठमुठे होऊन बसले आहे. शेतकºयांना गतवर्षी विकलेल्या तुरीचे पैसे आतापर्यंत मिळत नाहीत. सरकारी खरेदी केंद्रे ही नुसती नावापुरतीच आहेत. शेतकºयांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी यशवंत सिन्हा यांच्यासारखा  केंद्रपातळीवरील मोठा नेता अकोल्यात येऊन आंदोलन करतो आणि येथील प्रशासन राज्य सरकारच्या इशाºयावर त्यांना अपमानास्पद वागणूक देते. एवढ्या मोठ्या नेत्याला साधं चहा-पाणी ही विचारले नाही. हा यशवंत सिन्हा यांचा नव्हे, तर संपूर्ण शेतकºयांचाच अपमान आहे, असा घणाघाती आरोप करीत नाना पटोले यांनी जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी यशवंत सिन्हा, रविकांत तूपकर, शेतकरी जागर मंचाचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता नाहीभापजने निवडणूकीला सामोरे जाताना कापसाला पाच हजार रुपये प्रति क्विंटल देण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्यात व केंद्रातही भाजपचे सरकार आहे. कापसाला भाव मात्र चार हजारच्यावर मिळत नाही. शेतकºयांसाठी काम करण्याचे आश्वासन देऊन हे सरकार केवळ काही लोकांच्या भल्यांसाठी काम करत आहे. आणि हेच नाना पटोलेच दुखणं आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

सिन्हांच्या आंदोलनात वरुण गांधी, अरुण शौरीही येणार राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या  मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. यासाठी देशपातळीवरील नेत्यांच्या संपर्कात असून भाजपचे खासदार वरूण गांधी व माजी मंत्री अरुण शौरी यांनी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरYashwant Sinhaयशवंत सिन्हाNana Patoleनाना पटोले