शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

अखेर आॅफलाइन पीक विम्याचे १०.३८ कोटी मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 15:25 IST

जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकऱ्यांसाठी पीक विम्यापोटी १० कोटी ३८ लाख रुपयांची रक्कम अखेर शासनामार्फत मंजूर करण्यात आली आहे.

- संतोष येलकरअकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत दोन वर्षांपूर्वी खरीप हंगामात पीक विम्याचे ‘आॅफलाइन’ अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकऱ्यांसाठी पीक विम्यापोटी १० कोटी ३८ लाख रुपयांची रक्कम अखेर शासनामार्फत मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आॅफलाइन अर्ज केलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक विमा रकमेचा लाभ लवकरच मिळणार आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१७ यावर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढण्यासाठी ‘आॅनलाइन’ अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शेतकºयांचे ‘आॅफलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकºयांनी पीक विम्यासाठी सादर केलेले आॅफलाइन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात आले होते. पीक विम्यासाठी आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गतवर्षी जुलैमध्ये शासनाकडे सादर करण्यात आली होती. आॅफलाइन अर्ज केलेल्या शेतकºयांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी निधी मागणीचा प्रस्तावदेखील शासनाकडे सादर करण्यात आला होता. अखेर आॅफलाइन अर्ज केलेल्या शेतकºयांसाठी पीक विम्यापोटी शासनामार्फत १० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी लोकसभा निवडणुकीपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने मंजूर करण्यात आलेला निधी शासनामार्फत लवकरच प्राप्त होणार असून, जिल्ह्यात आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या ६ हजार ५९१ शेतकºयांना लवकरच पीक विमा रकमेचा लाभ मिळणार आहे.‘आॅफलाइन’ अर्ज केलेले असे आहेत शेतकरी!तालुका       शेतकरीअकोला        ११७३अकोट           १६५९तेल्हारा           ७६०बाळापूर         ६६९पातूर            ११४३बार्शीटाकळी   ७४६...............................................एकूण             ६५९१२०१७ मधील खरीप हंगामात पीक विम्यासाठी जिल्ह्यात आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकºयांसाठी विमा रकमेपोटी शासनामार्फत १० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर विम्याची रक्कम लवकरच शासनाकडून प्राप्त होणार आहे. रक्कम उपलब्ध झाल्यानंतर आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे.-अरुण वाघमारे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीCrop Insuranceपीक विमा