शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सखी मतदान केंद्राचे कौतुक संपले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 17:24 IST

दुपारी १ वाजतापपर्यंत १०४ महिलांनी मतदान केले. दिवसअखेरीस हा आकडा २५१ पर्यंतच गेला.

- नीलिमा शिंगणे-जगड  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मतदानामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही सखी मतदान केंद्राची स्थापना केली; मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी येथे झगमगाट पाहायला मिळाला नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनादेखील या केंद्राविषयी कौतुक राहिले नाही. तसेच महिला मतदारांचादेखील यावेळी निरुत्साह दिसून आला.लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदाच सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. अकोल्यात दोन केंद्र स्थापन करण्यात आले होते. मतदान केंद्राचा अवघा परिसरच गुलाबी करू न रांगोळ्यांनी सजविला होता. हिरकणी कक्षात खेळणी ठेवली होती.यावेळी मात्र असे सुंदर चित्र दिसले नाही. यावेळी अकोल्यात सीताबाई कला महाविद्यालय येथे सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली. केवळ एका खोलीत सखी बुथ तयार करू न गुलाबी फुगे स्वागत कमानीवर लावले होते. सेल्फ ी पॉइंटही उभारला होता. स्तनदा मातांच्या सोयीकरिता हिरकणी कक्ष स्थापन केला होता; परंतु या कक्षाला पडदे लावण्यात आलेले नव्हते. पिण्याच्या पाण्याचीदेखील सुविधा नव्हती. प्रसाधनगृहदेखील उपलब्ध केलेले नव्हते.मतदान केंद्रात पाच महिला अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले होते. सुरक्षिततेसाठी महिला पोलीस शिपाई तैनात होत्या. अधिकारी व महिला पोलीसदेखील महिला मतदारांच्या प्रतीक्षेत बसलेल्या दिसल्या. सकाळी ७ वाजतापासून या मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले. एकट-दुकट महिला केंद्रावर येत होत्या. दुपारी १ वाजतापपर्यंत १०४ महिलांनी मतदान केले. दिवसअखेरीस हा आकडा २५१ पर्यंतच गेला. या ठिकाणी मतदान करण्यास आलेल्या माधुरी चिखलकर, स्नेहल धनोकार, शीतल जोशी आदी महिलांनी सांगितले की, मतदान करण्यास आले असता गर्दी नसल्यामुळे कोणताही त्रास झाला नाही. मतदान हा जन्मसिद्ध हक्क असल्याने प्रत्येक महिलेने मतदान करण्यास आवर्जून यायला पाहिजे. तसेच एका महिलेने येथे बर्थडे पार्टीमध्ये आल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले.उच्च व मध्यमवर्गीय बहुतांश महिला पुरुषांवर अवलंबून असल्यामुळे मतदान केंद्रावर पोहचू शकल्या नाहीत. तसेच सलग सुट्या आल्यामुळे महिलांनी बाहेरगावी फिरण्याचा बेत आखला. मुलांना आणि घरातील प्रमुख पुरुषाला सुट्टी असल्यामुळे मतदानाकडे महिलांनी दुर्लक्ष केले. याशिवाय प्रशासनने या केंद्राकडे यावेळी दुर्लक्ष केले असल्याची मतदान केंद्र परिसरात चर्चा होती.

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019