शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विषय शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया २१ जानेवारीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:08 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ४७३ शिक्षकांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना अद्यापही नियुक्ती मिळालेली नाही.

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ४७३ शिक्षकांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना अद्यापही नियुक्ती मिळालेली नाही. दरम्यान, विषय शिक्षकांच्या नियुक्तीच्या फाइलवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले; मात्र १९ जानेवारीपर्यंत होणाºया शालेय क्रीडा स्पर्धांमुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आता पदस्थापनेची प्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरू होणार आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार सहावी ते आठवी विषय शिक्षकांची ५५३ पदे रिक्त असल्याने विषय शिक्षकांची नियुक्ती करावी आणि सेवाज्येष्ठतेनुसार समुपदेशनाने ही पदे भरावीत, शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अकोला जि.प.मध्ये विषय शिक्षकांच्या पदभरतीअभावी सहायक शिक्षक अतिरिक्त झाल्याने, त्यांना रॅन्डम राउंडमध्ये तालुका बदलून नियुक्ती दिली होती. तीन महिने उलटूनही विषय शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागला नाही. दरम्यान, गेल्या शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी विषय शिक्षक नियुक्तीच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. त्यावेळी सोमवारपासून विषय शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता होती; मात्र पंचायत समिती स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या. त्यामध्ये बदली होणाºया शिक्षकांचाही सहभाग आहे. पदस्थापना प्रक्रिया राबवल्यास त्यांची बदली होईल. त्यांची शाळा बदल होईल. या काळात शालेय स्पर्धांमध्ये अडचण येण्याची शक्यता असल्याने पदस्थापनेची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक