शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर यांच्यासह दोन उमेदवारांचे अर्ज दाखल !

By संतोष येलकर | Updated: March 31, 2024 19:07 IST

अकोला लोकसभा निवडणूक; उमेदवारी दाखल करण्याचा दुसरा दिवस

अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवार ३० मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह दोन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे दाखल करण्यात आले. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २८ मार्चपासून सुरू झाली असून, त्यामध्ये पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

शुक्रवार २९ मार्च रोजी सार्वजनिक सुटी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बंद होती. शनिवार ३० मार्च रोजी अकोला मतदारसंघातून दोन उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि अपक्ष उमेदवार मुरलीधर पवार यांच्या उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. ॲड. आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषदेचे सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने व सिद्धार्थ सिरसाट यांनी प्रस्तावक व सूचक म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ४ एप्रिलपर्यंत असून, रविवार ३१ मार्च रोजी सुटीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

२४ इच्छुक उमेदवारांनी घेतले ५१ अर्ज !अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शनिवार ३० मार्च रोजी २४ इच्छुक उमेदवारांनी ५१ उमेदवारी अर्जांची जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उचल केली. यापूर्वी २८ मार्च रोजी २२ इच्छुक उमेदवारांकडून ३८ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली होती. त्यामुळे ३० मार्चपर्यंत मतदारसंघात ४६ इच्छुक उमेदवारांकडून ८९ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली असून, त्यामध्ये विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

उमेदवारी दाखल करण्यासाठी सोमवारपासून होणार गर्दी !उमेदवारी दाखल करण्याची मुदत गुरुवार ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार १ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसह समर्थकांची जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात गर्दी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोला