राज्यस्तरीय वऱ्हाड लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदी अपामार्जने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 05:57 PM2019-10-02T17:57:31+5:302019-10-02T17:59:29+5:30

या संमेलनाच्या अध्यक्ष पदी राष्ट्रीय कीर्तनकार न. चि. अपामार्जने यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.

Aparjane elected as president of the state-level Folk Art Conference at Akola | राज्यस्तरीय वऱ्हाड लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदी अपामार्जने

राज्यस्तरीय वऱ्हाड लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदी अपामार्जने

Next

अकोला : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रस्तुत वºहाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्था लोणी व श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे वºहाड लोककला साहित्य संमेलन १० आॅक्टोबर रोजी श्री शिवाजी महाविद्यालय येथे होणार असून, या संमेलनाच्या अध्यक्ष पदी राष्ट्रीय कीर्तनकार न. चि. अपामार्जने यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय कीर्तनकार अपामार्जने यांचा जन्म १९३९ मध्ये उज्जैन येथे झाला. यांना कीर्तन क्षेत्रातील कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये संस्कृत कार्यसाठी व कीर्तन क्षेत्राततील कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार मिळाले आहेत. नारदीय कीर्तनाचा आणि राष्ट्रीय कीर्तनाचा प्रसार करण्याकरिता भारतातील अनेक प्रांतात कीर्तन पोहोचविले. पुण्यामध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कीर्तन महाविद्यालय प्रारंभ करून कीर्तन या लोककला प्रकारात विद्यार्थी निर्माण करण्याचे कार्य ते करीत आहेत.
संमेलनाचे समारोपीय अध्यक्ष म्हणून लोकवाड्मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड झाली. डॉ. देखणे हे प्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्य व लोकवाड्मयाचे व्यासंगी अभ्यासक तसेच व्याख्याते, प्रवचनकार, वारकरी कीर्तनकार, आणि बहुरूपी भारुडकार म्हणून सुपरिचित आहेत. डॉ. देखणे यांची ललित, संशोधनात्मक तसेच चिंतनात्मक ४७ पुस्तके प्रकाशित आहेत.
संमेलन १० आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. या संमेलनामध्ये या मान्यवरांच्या भाषण सह बोलीभाषा, लोककला व सांस्कृती या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाचे अध्यक्ष भाष्याभ्यासक डॉ. केशव तुपे राहणाार आहेत. तसेच, वºहाडात प्रचलित असलेल्या विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कलांमध्ये वारकरी भजन, भारूड - स्त्रियांचे आणि पुरुषांचे, एकतारी भजन, अवधुती भजन, बंजारा होळी नृत्य, कोरकू लोकनृत्य, वासुदेवाचे गाणे, जात्यावरील गाणे, गोंधळ, ढोलाचे भजन आणि ठावा इत्यादी लोककलांचे सादरीकरण लोककलावंतच करणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब काळे यांनी दिली आहे.

 

Web Title: Aparjane elected as president of the state-level Folk Art Conference at Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.