शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
3
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
4
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
5
“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
6
IND vs NZ : आधी हळू चेंडू टाकला मग वेग पकडला! दोन्ही सलामीवीरांचा हर्षित राणानं केला ‘करेक्ट कार्यक्रम'
7
सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा
8
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
9
‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान
10
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
12
'X'वर अश्लील कंटेंट विरोधात अ‍ॅक्शन, ६०० अकाउंट डिलीट; मोदी सरकारच्या इशाऱ्यानंतर, इलॉन मस्क यांची कारवाई
13
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
14
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
15
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
16
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
17
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
18
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
19
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा आणखी एक बळी; सात नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ११३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 11:43 IST

यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ११३ झाला आहे.

ठळक मुद्देएकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २७०८ वर पोहचली आहे. सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, ४ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे मुर्तीजापूर येथील एकाचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ११३ झाला आहे. तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये सात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २७०८ वर पोहचली आहे.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे २४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर उर्वरित १७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह सात अहवालांमध्ये तीन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मुर्तिजापूर येथील दोघांसह, जूने शहर, वाडेगाव, कौलखेड, न्यू राधाकिसन प्लॉट व डाबकी रोड येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.मुर्तीजापूरात एकाचा मृत्यूकोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच असून, मंगळवारी मुर्तीजापूर येथील ५० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ३१ जुलै रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.३८६ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २२०९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३८६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल- २४पॉझिटीव्ह- ७निगेटीव्ह- १७आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- २३३९+३६९=२७०८मयत-११३डिस्चार्ज- २२०९दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह- ३८६)

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या