आॅनलाइन लोकमतअकोला : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने तापमानात प्रचंड वाढ झाल्यानंतरही शहरात स्वाईन फ्लू चे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी शहरातील डाबकी रोड भागातील एका महिलेला स्वाईन फ्लू ची लागन झाल्याचे समोर आले. सदर महिलेवर शहरातील खासगी इस्पितळात उपचार सुरु आहेत. शहरात मार्च महिन्यात स्वाईन फ्लू चा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर या आजाराचा शहरात झपाट्याने प्रसार झाला. दोन महिन्यात चार जणांचा मृत्यू या आजाराने झाला. दरम्यान, मे महिन्यात वाढत्या तापमानामुळे स्वाईन फ्लू चा कहर कमी झाल्याचे दिसत होते. परंतु, सोमवारी आणखी एक रुग्ण आढळून आला. सदर महिला डाबकी रोड भागातील रहिवासी असून, तीला स्वाईन फ्लू सदृश लक्षणे आढळून आल्यानंतर खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे स्रॉब घेऊन तपासणी केली असता, तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान, सदर महिला राहत असलेल्या भागात मंगळवारी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी सांगितले.
‘स्वाईन फ्लू’चा आणखी एक पॉझिटीव्ह रुग्ण आढळला
By admin | Updated: May 15, 2017 19:53 IST