शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जबरी चोरी प्रकरणातील आणखी एक पिस्तूल जप्त; आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 09:51 IST

दहीहांडा पोलिसांनी पडसोद येथील घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे आणखी एक पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आली आहेत.

तेल्हारा: वाडी अदमपूर येथील दरोडा प्रकरणातील अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना केवळ एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सोमवारी दहीहांडा पोलिसांनी पडसोद येथील घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे आणखी एक पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आली आहेत.तालुक्यातील वाडी अदमपूर येथील ताराचंद बजाज यांच्या घरी रविवारी रात्री दरोडा टाकून १.७८ लाखांचा ऐवज आरोपी अस्लम शहा, त्याची पत्नी मुस्कान या दोघांनी लंपास केल्याची घटना घडली होती; मात्र तेल्हारा पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून दोघांना जेरबंद केले. आरोपींकडून चोरीच्या मुद्देमालासह ५.७० लाखांचा माल व धारधार शस्त्र आरोपींच्या शिवणी येथील घरातून जप्त केले, तसेच आरोपीकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस हस्तगत केली. दुसऱ्या दिवशी दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पडसोद येथील शेतशिवारात पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. आणखी एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आढळून आली. आरोपीने एक पिस्तूल फेकून दिली व एक जवळ ठेवली होती, तसेच आरोपीने घरमालकाचा मोबाइल उकळी बाजार शेतशिवारात फेकून दिला असता, पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने केवळ एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नीलेश देशमुख करीत आहेत.   आरोपी हा कुख्यात गुन्हेगारदरोडा प्रकरणातील पकडण्यात आलेला आरोपी हा कुख्यात गुन्हेगार प्रवृत्तीचा असून, यापूर्वी त्याच्यावर पुणे येथे गुन्हे दाखल आहेत. त्याने यापूर्वी अनेकदा पिस्तूलसह गुन्हे केले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. पिस्तूल आल्या कुठून?आरोपीकडे दोन पिस्तूल व चार जिवंत काडतूस आढळून आली आहेत. हे पिस्तूल व काडतुसे आरोपीकडे कुठून आली, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आरोपिला एका दिवसाचीच पोलीस कोठडी मिळाल्याने पोलीस काय भूमिका घेतात, हे तपासात उघड होईल.

 

टॅग्स :Telharaतेल्हाराCrime Newsगुन्हेगारी