शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

तुषार पुंडकर हत्याकांडातील आणखी आरोपी रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 18:00 IST

या प्रकरणात अकोटातील काही उद्योजकांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.

अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर हत्याकांडातील आणखी काही आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या आरोपींच्या मागावर असून, त्यांनाही लवकरच बेड्या ठोकण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात अकोटातील काही उद्योजकांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती असून, राजकीय दृष्टीच्या दिशेनेही तपास करण्यात येत असल्याचे खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे.अकोट शहर पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस वसाहतमध्ये तुषार पुंडकर यांच्यावर २१ फेब्रुवारी रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनीही दोन्ही पिस्तूलमधून गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तुषार पुंडकर यांच्या हत्येचा कट रचून त्यांची हत्या केल्याने पोलिसांनी अथक परिश्रम करून या प्रकरणातील आरोपी अकोट शहरातील रहिवासी पवन सेदानी, श्याम नाठे आणि अल्पेश दुधे या तीन आरोपींना २६ मार्च रोजी अटक केली. त्यानंतर निखिल सेदानी आणि गुंजन चिचोळे या दोन आरोपींनाही अटक करण्यात आली असून, दोन पिस्तूल आणि चार काडतूस जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने सुरू असून, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर प्रत्येक स्तरावर या तपासातील बाबींवर नियंत्रण ठेवून मार्गदर्शन करीत आहेत. या प्रकरणातील पाचही आरोपी पोलीस कोठडीत असून, या दरम्यान आणखी काही नावे समोर येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सदर प्रकरणात आणखी काही आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी