शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमरावती विभागाला लसीचे आणखी ९१ हजार डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 10:40 IST

Corona Vaccine : अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक लसीचा पुरवठा झाला असून, अकोल्यासाठी मात्र दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देकोव्हॅक्सिन १३,६००, तर कोविशिल्डचे ७८ हजार डोसअमरावती जिल्ह्याला सर्वाधिक लस

अकोला: मागील काही दिवसापासून अकोल्यासह विभागात कोविड लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. अशातच बुधवारी विभागासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे ९१ हजार ६०० डोस प्राप्त झाले. यामध्ये कोव्हॅक्सिनचे १३,६००, तर कोविशिल्डचे ७८ हजार डोस आहेत. अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक लसीचा पुरवठा झाला असून, अकोल्यासाठी मात्र दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा प्राप्त झाला आहे. कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना आता दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे, मात्र लसीचे पर्याप्त डोस उपलब्ध नसल्याने अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग मंदावला आहे. कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी होत असल्याने, अनेकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करावी लागत आहे. बुध‌वारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसीचे डोस प्राप्त झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी बुधवारी सायंकाळी विभागातील पाचही जिल्ह्यांना लसीचे वितरण केले.

जिल्हानिहाय प्राप्त लस

जिल्हा - कोव्हॅक्सिन - कोविशिल्ड

अकोला - १३०० - १४,४००

अमरावती - ३५०० - २०,५००

बुलडाणा - ३००० - १६,२५०

वाशिम - ३५०० - १२०००

यवतमाळ - २३०० - १४,८५०

---------------------------

एकूण - १३,६०० - ७८०००

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAmravatiअमरावतीAkolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिमYavatmalयवतमाळ