शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १००४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९४७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकीरोड येथील चार, जठारपेठ, कौलखेड व गोरक्षणरोड येथील प्रत्येकी दोन, शास्त्रीनगर, श्रीराम चौक, जुने शहर, न्यू खेताननगर, सावकार नगर, रजपूतपुरा, खडकी, राधेनगर, अकोट, बाळापूर नाका, मूर्तिजापूर, गीता नगर, खडकी, रामनगर, छोटी उमरी, रणपिसे नगर व सिव्हिल लाइन येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी तेल्हारा येथील चार, अकोट येथील तीन, गोरक्षण रोड येथील दोन, नकाशी, ता. बाळापूर, बाळापूरनाका, वाडेगाव, पिंपरी जैनपूर, ता. अकोट, शिव वडनेर, ता. तेल्हारा, दहीगाव, ता. तेल्हारा, हिवरखेड, ता. तेल्हारा, श्रीनाथ मनब्दा, ता. तेल्हारा, अडसूळ, ता. तेल्हारा, दुर्गा चौक, चौरे प्लॉट, कौलखेड, काँग्रेसनगर, बलवंतनगर, जवाहरनगर, वर्धमाननगर, नालंदानगर, अडसना, हिंगणारोड, भांडपुरा चौक व सोमठाणा येथील प्रत्येकी एक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
१५ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून चार, हॉटेल रेजेन्सी येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले चार, अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५१७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,६९७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,८५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५१७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.