कोविड लसीकरणासाठी मिळणार आणखी २२ ‘आयएलआर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 10:27 AM2021-04-15T10:27:51+5:302021-04-15T10:29:47+5:30

covid vaccination : अकोला मंडळाला आणखी २२ ‘आयएलआर’चा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Another 22 ILRs will be available for covid vaccination | कोविड लसीकरणासाठी मिळणार आणखी २२ ‘आयएलआर’

कोविड लसीकरणासाठी मिळणार आणखी २२ ‘आयएलआर’

Next
ठळक मुद्देयापूर्वी मिळाले होते ८२ आयएलआरवॉक इन कुलरची प्रतीक्षा कायमच

अकोला: जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोविड लसीकरण उत्साहात सुरू आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत लस सुरक्षित ठेवण्यासाठी ‘आईस लाईंड रेफ्रिजरेटर’ (आयएलआर)ची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत अकोला मंडळाला आणखी २२ ‘आयएलआर’चा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी विभागासाठी ८२ आयएलआर पुरविण्यात आले होते. गुरुवारी हे आयएलआर अकोल्यात दाखल होण्याची शक्यता असून, ते मिळताच आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत गुरुवारी पाचही जिल्ह्यात आयएलआरचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये कोविड लसीकरणाचा वेग वाढला आहे. लसीकरणाला वाढता प्रतिसाद पाहता पाचही जिल्ह्यात आवश्यकतेनुसार कोविड लसीकरण केंद्र वाढविण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने प्राप्त लस विविध लसीकरण केंद्रावर राखून ठेवण्यासाठी आईस लाईंड रेफ्रिजरेटर म्हणजेच आयएलआरची आवश्यकता असते. ही गरज पाहता केंद्र शासनामार्फत आरोग्य विभागाच्या अकोला मंडळासाठी आणखी २२ आयएलआर पाठविण्यात येणार आहेत. यापूर्वी केंद्र शासनामार्फत विभागासाठी ८२ आयएलआर आणि तीन डीप फ्रिझर प्राप्त झाले होते. हे आयएलआर तालुकास्तरावर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर आवश्यकतेनुसार पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

वर्षभरानंतरही वॉक इन कुलरची प्रतीक्षा

विभागासाठी कोविड लसीचा मोठा साठा उपलब्ध झाला आहे, मात्र अद्यापही केंद्र शासनामार्फत ४० क्युबिक मीटर क्षमतेचा प्रस्तावित वॉक इन कुलर प्राप्त झाला नाही. विभागासाठी आणखी मोठ्या प्रमाणात लस मिळण्याची शक्यता आहे, मात्र वेळेवर वॉक इन कुलर न मिळाल्याने कोविड लस ठेवण्याची पंचाईत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हा निहाय ‘आयएलआर’ची संख्या

जिल्हा - आयएलआरची संख्या

अकोला - ४

अमरावती - ३

बुलडाणा - ६

वाशिम - ५

यवतमाळ - ४

Web Title: Another 22 ILRs will be available for covid vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.