शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १८ जणांचा मृत्यू, ६७० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,९०३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,९०३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २,४०० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये कडोशी, ता. बाळापूर येथील ५३ वर्षीय पुरुष, कोथळी खु. बार्शिटाकळी येथील ६७ वर्षीय पुरुष, राजपूतपुरा येथील ५७ वर्षीय पुरुष, काळेगाव ता. अकोला येथील ७६ वर्षीय पुरुष, अकोट येथील ६६ वर्षीय महिला, जुने शहर भागातील ६५ वर्षीय पुरुष, खदान येथील ३० वर्षीय पुरुष, पातूर येथील ६५ वर्षीय महिला, तापडियानगर येथील ८० वर्षीय पुरुष, बार्शिटाकळी येथील ५५ वर्षीय महिला, अकोट येथील ५५ वर्षीय महिला, तारफैल येथील ७२ वर्षीय पुरुष, खिरपूर ता. बाळापूर येथील ६९ वर्षीय पुरुष, उमरी येथील ७६ वर्षीय महिला, पातूर येथील ७२ वर्षीय पुरुष, अकोट स्टॅण्ड अकोला येथील ५५ वर्षीय महिला, गोविंदनगर, अकोला येथील ६७ वर्षीय महिला व राऊतवाडी, अकोला येथील ७३ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या

मूर्तिजापूर- ९१ , अकोट- १२६, बाळापूर-३१, तेल्हारा-६०, बार्शिटाकळी-३५, पातूर-११, अकोला-१४९. (अकोला ग्रामीण-३६, अकोला मनपा क्षेत्र-११३)

५४६ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११, आयुर्वेदिक महाविद्यालय येथील तीन, खासगी रुग्णालयातील ६२ आणि होम आयसोलेशनमधील ४६५ अशा एकूण ५४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६,६५२ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५२,३१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४४,६९१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ९७६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,६५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.