शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

अंगणवाडी सेविकांचे अहवाल बंद आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 15:09 IST

अकोला: मानधनवाढ व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत मोबाइल तसेच मासिक अहवाल पाठविण्यावर सोमवार २२ जुलैपासून संपूर्ण बहिष्कार टाकणार आहेत.

अकोला: मानधनवाढ व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत मोबाइल तसेच मासिक अहवाल पाठविण्यावर सोमवार २२ जुलैपासून संपूर्ण बहिष्कार टाकणार आहेत. हे आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे पुकारण्यात आले आहे.मानधन वाढ व पेन्शन तसेच डिजिटल कामकाज करताना अंगणवाडी सेविकांना येणाऱ्या विविध समस्यांसदर्भात रविवार २१ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हा शाखेची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुनीता पाटील होत्या. बैठकीत अंगणवाडी सेविकांना प्रत्यक्ष काम करताना येणाºया अडचणींवर चर्चा करून आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. आंदोलनांतर्गत प्रत्येक अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनीस दिलेल्या मसुद्यानुसार शासनाला पत्र लिहून पोस्टाने पाठविणार आहेत. यामध्ये मोबाइल नादुरुस्त झाल्यास तसेच हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास शासनाने कोणतीही नुकसानभरपाई मागू नये. उलट ताबडतोब त्या जागी दुसरा मोबाइल द्यावा. अंगणवाडी सेविकांकडून भरून घेण्यात आलेले हमीपत्र रद्द करावे. प्रशासनाने सेविकांकडून नुकसान भरपाई वसूल केल्याचे आढळून आल्यास संपूर्ण राज्यातील सेविका आपापले मोबाइल प्रशासनाकडे जमा करतील. सेविकांची जागा रिक्त असल्यास तिचे मोबाइलवरील काम करण्याची मदतनीस किंवा अन्य सेविकांवर सक्ती करण्यात येऊ नये आदी मागण्यांचा समावेश असणार आहे. बैठकीला तालुका अध्यक्ष व सचिव एस.एन. सोनोने, रमेश गायकवाड, सुनीता पाटील, नयन गायकवाड, दुर्गा देशमुख, कुसुम हागे, त्रिवेणी मानवटकर, ज्योती धस, अल्पना महल्ले, वेणूताई इंगले, रत्नकला गायगोळ, वंदना डांगे, संगीता बुटे, रामदास ठाकरे, सुहास अग्निहोत्री, रत्नकला तायडे, विद्याधर ढोरे, उपस्थित होते. संचालन रमेश गायकवाड यांनी तर आभार वंदना डांगे यांनी मानले.या आहेत प्रमुख मागण्या२०१८ पासून लागू होणाºया केंद्रीय मानधनवाढीच्या फरकासहित अंमलबजावणी करावी. निम्म्या मानधनाइतकी मासिक पेन्शन लागू करावी. या संदर्भात ११ जून रोजी महिला व बाल विकास मंत्र्यांनी घोषणा केली होती. मोबाइल संदर्भातील समस्यांवर ताबडतोब तोडगा काढण्यात यावा.९ आॅगस्ट रोजी अंगणवाड्या बंदनियोजनानुसार ९ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन