शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीचा विजय भोयर ठरला ‘विदर्भ श्री-२०२०’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:20 IST

शरीर सौष्ठव स्पर्धेत अमरावतीचा शरीर सौष्ठवपटू विजय भोयर ‘विदर्भ श्री २०२०’चा मानकरी ठरला आहे

अकोला : विदर्भ बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत अमरावतीचा शरीर सौष्ठवपटू विजय भोयर ‘विदर्भ श्री २०२०’चा मानकरी ठरला आहे. यावेळी भारत श्री २०१९ च्या मानकरी स्नेहा कोकणे पाटील यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरले.विदर्भ बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम गावंडे यांनी शनिवार, ७ मार्च रोजी कौलखेडस्थित गजानन महाराज मंदिर परिसरात ‘विदर्भ श्री २०२०’ शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘युवक बलदंड तर देश बलदंड’, या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गुलाबराव गावंडे, उद्घाटक एशियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी संजय मोरे, विशेष आकर्षण भारत श्री स्नेहा कोकणे पाटील, डॉ. संतोषकुमार कोरपे, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, उपविभागीय अधिकारी सचिन कदम व श्रीकांत पिसे पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक संग्राम गावंडे यांनी केले. युवकांच्या बळावर हा देश महासत्ता होऊ शकतो, असे मत माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी व्यक्त केले. क्रीडा क्षेत्रामध्ये मुलींनी भरारी घ्यावी, असे आवाहन यावेळी स्नेहा कोकणे पाटील यांनी केले. याप्रसंगी तुकाराम बिडकर, गजानन दाळू गुरुजी यांनीही मनोगत व्यक्त केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विदर्भ बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम गावंडे, महासचिव अभिषेक कारिंगवार, नगरसेवक मंगेश काळे, माजी नगरसेवक पंकज गावंडे, टिपू शिंदे, विशाल गावंडे, शिवा मोहोड, अक्षय भालतिलक, अभिजित मुळे, करण दोड, शरद सरप, गजू पावसाळे, सुमित नागझरे, गौरव इंगळे व सागर चांभारे यांनी पुढाकार घेतला. स्पर्धेत विविध वजनगटात नागपूर येथील प्रकाश निमजे, रेहान कुरेशी, सुरेंद्र शाहू, तर अकोल्यातील शेख सलीम, सय्यद कुरम, सुयश जडिये विजेते ठरले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.हे आहेत स्पर्धेतील विजेतेविदर्भ श्री २०२० - विजय भोयर, अमरावतीबेस्ट पोझर - शुभम कडू पाटील अमरावतीबेस्ट इम्पू्रमेंट - सुरेंद्र शाहू, नागपूर.

 

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीbodybuildingशरीरसौष्ठव