शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन हायवे पॉलिसीत अमरावती-चिखली नाही! पश्चिम विदर्भातील एनजीओ-नर्सरी संचालकांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 11:04 IST

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारात देशभरात राबविल्या जात असलेल्या ग्रीन हायवे पॉलिसीत अमरावती-चिखली चौपदरीकरण मार्ग नसल्याची माहिती समोर आली आहे.

संजय खांडेकर/ अकोला : केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारात देशभरात राबविल्या जात असलेल्या ग्रीन हायवे पॉलिसीत अमरावती-चिखली चौपदरीकरण मार्ग नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्रीन हायवे पॉलिसीवर लक्ष ठेवून बसलेल्या पश्चिम विदर्भातील एनजीओ-नर्सरी संचालकांना जबर धक्का बसला आहे. देशभरात चार पदरी, सहा, आठ पदरी मार्ग निर्माणचे कार्य राष्ट्रीय महामार्गाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. मोठ्या रूंदीच्या या मार्गांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष कटाई केली जाते. ही वृक्ष कटाई होत असतानाच केंद्राने १० कोटी रोपांची लागवड करण्याची घोषणा केली होती.

राष्ट्रीय महामार्गावरील प्रदूषण आणि कार्बनडाय आॅक्साईडचा वायू कमी करण्यासाठी ग्रीन हायवेची विशेष पॉलिसी आखण्यात आली. पूर्वी मार्ग निर्माण करणा-या कंत्राटदाराकडेच रोपे लावण्याची आणि त्याची काळजी घेण्याची जबाबदारी दिली जायची. मात्र, कंत्राटदाराचे मार्ग बांधकाम झाले, की ते वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष करायचेत. ही बाब अधोरेखित झाल्यानंतर केंद्र सरकार आणि विशेष करून केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी ग्रीन हायवे पॉलिसी अस्तित्वात आणली. ज्या-ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होईल, त्या ठिकाणी वन विभाग आणि एनजीओ मार्फत महामार्गांच्या दोन्ही बाजूला रोप लागवड केली जाईल.

केवळ लागवडच नव्हे, तर या रोपांच्या संगोपन आणि संवर्धनाची जबाबदारीदेखील या संस्थेकडे दिली गेली आहे. ग्रीन हायवे पॉलिसी आपल्याकडेही अस्तित्वात येईल, या अपेक्षेत पश्चिम विदर्भवासी होते. अमरावती- चिखली चौपदरीकरणाचे (एनएच-६चे ) काम चार टप्प्यात सुरू झाल्याने ग्रीन हायवे प्रकल्प आपल्याकडे राबविला जाईल म्हणून अमरावती- चिखलीपर्यंत अनेक सामाजिक संस्थांनी नर्सरी डेव्हलप करून ठेवली. कारण विदर्भाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तसे आवाहन अनेकदा भाषणातून केले. मात्र, अलीकडेच न्यायालयाने जेव्हा वृक्षकटाई संदर्भात निर्देश दिलेत. त्यातून अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग ग्रीन हायवे पॉलिसीतून वगळला असल्याचे समोर आले आहे. काय आहे ग्रीन हायवे पॉलिसी?ग्रीन हायवे पॉलिसी हा केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.भारतात सध्या पायाभूत सुविधांवर भर दिल्या जात असून, यांतर्गत पक्क्या रस्त्यांची निर्मिती हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या रस्त्यांची निर्मिती व रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाचा -हास होण्याची शक्यता लक्षात घेता, नितीन गडकरी यांनी २०१५ मध्ये ‘ग्रीन हायवे पॉलिसी’ हे अभियान सुररू केले. देशात सध्या ९६ हजार २६० किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. या अभियानांतर्गत देशभरातील राष्ट्रीय महामार्गांलगत सामाजिक संघटना, शेतकरी, खासगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणेच्या भागीदारीतून महामार्गांलगत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. महामार्गांलगत झाडे लावून देशभरात हरितपट्टे तयार करण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

वृक्षलागवड केली जाणार अमरावती-चिखली चौपदरीकरणाच्या कंत्राटाची निविदा जेव्हा काढली गेली, तेव्हा ग्रीन हायवे पॉलिसी अस्तित्वातच आली नव्हती. त्यामुळे अमरावती-चिखली या मार्गावर जुन्या पद्धतीनेच कंत्राटदाराकडून वृक्षलागवड केली जाणार आहे. - विलास ब्राह्मणकर कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग (चौपदरीकरण ) विभाग अमरावती.