शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय दूध डेअरीतील वायू गळती नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 13:12 IST

अकोला : येथील शासकीय दूध डेअरी प्रकल्पातील प्रशीतन यंत्रणेतून गुरुवारी झालेली अमोनिया वायूची गळती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.

अकोला : येथील शासकीय दूध डेअरी प्रकल्पातील प्रशीतन यंत्रणेतून गुरुवारी झालेली अमोनिया वायूची गळती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रशीतन यंत्रणा दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेण्यात आले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत यंत्रणेचे कामकाज पूर्ववत सुरू होईल, असे दुग्धशाळा व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले.शासकीय दूध योजना प्रकल्पात दुधावर प्रक्रिया करून भुकटीत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेसाठी अमोनिया वायूवर आधारित प्रशीतन यंत्रणा, हॉट वॉटर यंत्रणा, प्रक्रिया संयंत्र व होमजीनायजर यंत्रणा कार्यरत असते. गुरुवार, १७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता प्रशीतन विभागातील अ‍ॅटमॉसफेरिक कंडेन्सरच्या एका कॉइलच्या व्हॉल्व्हमधून अमोनिया वायू गळती सुरू झाल्याचे यंत्र चालकाच्या निदर्शनास आले. तातडीची उपाययोजना म्हणून इतर व्हॉल्व्ह बंद करण्यात आले. तोपर्यंत वायू वातावरणात पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा व डोळ्यांचा त्रास सुरू झाला. अग्निशामक यंत्रणेला पाचारण करण्यात आले. पाण्याचा मारा केल्यानंतर व यंत्रणेत असलेला वायू दुसऱ्या रिसिव्हरमध्ये पाठविण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.अमोनिया यंत्रणा ही प्रेशरवर चालणारी असून, लिकेज झाल्यास त्या ठिकाणातून हा वायू बाहेर पडतो. पाण्याचा मारा केल्यास तो वायू विरघळतो. ही कार्यपद्धती योजण्यात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे, असे दुग्धशाळा व्यवस्थापकांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात