शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अकोट तालुक्यातील अंबोडा गावाच्या खडकाळ माळरानावर फुलले नंदनवन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 13:20 IST

अकोला : महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडी गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले.

ठळक मुद्देहरिदास गुलाबराव ताठे २००४-०५ दरम्यान महाराष्ट्र  जीवन प्राधिकरण अकोट उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी या सिंचन तलावाची पाहणी केली.पाइपलाइनद्वारे गॅ्रव्हीटेशनल फोर्सद्वारे २४ तास पाणी देण्यासाठी धरणाच्या पात्रात एका बाजूला जॅकवेल बांधण्यात आलेली आहे. आजमितीस येथे ३४ एकरावर सिंचन करण्यात येत असून, शेत तेथे पाण्याचे पाइप टाकण्यात आले आहेत.

- राजरत्न सिरसाट 

अकोला : सातपुड्याच्या पर्वत रांगा, पायथ्याशी खडक, दगड, शेती कसणे, करणे म्हणजे खडकासारखे खडतर... पण, आता येथे काळ््या आईने हिरवा शालू पांघरला... ४२ वर्षांच्या संघर्षानंतर सिंचन तलावातून शेतकºयांना पाणी मिळालं तेही विजेविना... महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडा  गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले.अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी अंबोडा  गाव आहे. या भागातील शेतकºयांचे आर्थिक, सामाजिक जीवन उंचावण्यासाठी सन १९७६ मध्ये या गावाच्या वरच्या बाजूला एक धरण बांधण्यात आले आहे. ३१३ एकर सिंचन क्षमता असलेल्या या धरणाच्या लाभ क्षेत्रात ६८ शेतकरी येतात. या धरणाचे पाणलोट क्षेत्र उत्तम असून, हे धरणा पहिल्या दोन-तीन पावसात पूर्ण पाण्याने भरू न जातं. शाश्वत पाणी उपलब्ध असल्याने पाण्याची बचत करू न जास्तीत जास्त शेतकºयांना विनावीज, तुषार, ठिबक सिंचन पद्धतीने या पाण्याचा लाभ शेतकºयांना घेता यावा, हा उद्देश हे धरण बांधण्यामागे होता. पण, ४२ वर्षांत या धरणातून सिंचन झालं ते नावापुरतच... ते म्हणजे ३२.४१ टक्केच. मागील दोन दशकापासून सिंचनासाठीचा कालवा बुजल्याने शेतकºयांना पाणी मिळत नव्हत.हरिदास गुलाबराव ताठे २००४-०५ दरम्यान महाराष्ट्र  जीवन प्राधिकरण अकोट उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी या सिंचन तलावाची पाहणी केली. या तलावातून उत्तमरीत्या सिंचन होत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांना भेटून, या धरणाची स्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली.शेतकºयांनी पाणी वापर सहकार संस्थेची नोंदणी केली. ताठे यांनी त्यानंतर मागे बघता, या धरणातून शेतकºयांना पाणी देण्याचे नियोजन केले. धरण गावाच्या वरच्या बाजूने असल्याने त्यांनी कालव्याऐवजी पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला. पाइपलाइनद्वारे गॅ्रव्हीटेशनल फोर्सद्वारे २४ तास पाणी देण्यासाठी धरणाच्या पात्रात एका बाजूला जॅकवेल बांधण्यात आलेली आहे. त्या जॅकवेलमधून धरणाच्या बाहेर २.५० व्यासाचे तीन पाइप काढण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी तीन वेगळे प्लॉस्टिकचे पाइप जोडण्यात आले. विजेचा वापर न करता येथे २४ तास सिंचन व्यवस्था सुरू झाली आहे. शेत तेथे पाइपलाइन टाकण्यात आली असून, शेतकºयांनी त्यासाठी प्रतिएकर ९ हजार रुपये एकूण ९ लाख रुपये त्यासाठी खर्च केला. आजमितीस येथे ३४ एकरावर सिंचन करण्यात येत असून, शेत तेथे पाण्याचे पाइप टाकण्यात आले आहेत.

धरणातील पाण्याचा हिशेबप्रत्येक शेतासाठी स्वतंत्र पाणी पुवरठा व्यवस्थापन असून, धरणातील पाण्याचा लीटरमध्ये हिशेब ठेवण्यात येतो. सर्व शेतकºयांना एकाचवेळी पाणी उपलब्ध होत असून, शेतकरी आवश्यकतेनुसार केव्हाही पाणी उचलतात. विशेष म्हणजे ओलिताकरिता मजूरही लावण्याची गरज नाही. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणakotअकोटDamधरणagricultureशेती