शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

राष्ट्रीय राजकारणात वाढले आंबेडकरांचे महत्त्व!

By admin | Updated: June 25, 2017 08:09 IST

राष्ट्रपतीपदासाठी पहिल्यांदाच अकोलेकराच्या नावाची चर्चा

राजेश शेगोकार / अकोला राष्ट्रपतीपदासाठी भाजपाने रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी तोडीसतोड उमेदवाराचा शोध सुरू केला. या संभाव्य उमेदवारांमध्ये अँड. प्रकाश आंबेडकर यांचेही नाव डाव्या पक्षांनी पुढे केल्याने, राष्ट्रपतीपदासाठी प्रथमच अकोलेकर राजकीय नेत्याच्या नावाची चर्चा झाली. ही बाब अकोलकरांसाठी अभिमानाची ठरली. दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी उमेदवारच देण्यात यावा, या भूमिकेवर अँड. आंबेडकर ठाम राहिल्यामुळे मीरा कुमार यांचे नाव अंतिम झाले; मात्र या घटनाक्रमामुळे अँड. आंबेडकरांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व वाढल्याचे समोर आले आहे. अँड. प्रकाश आंबेडकर हे नाव देशाच्या राजकारणात नवीन नाही. नेहमीच प्रवाहाच्या विरोधात जाण्याचे अन् स्वतंत्र राजकारण करण्याची त्यांची शैली असल्यामुळे त्यांनी बहुतांश सत्ता या स्वबळावरच मिळविल्या आहेत. केवळ दलितांचे राजकारण न करता मुस्लीम, बहुजनांची मोट बांधत त्यांनी देशात सर्वप्रथम ह्यसोशल इंजिनिअरिंगह्णचा प्रयोग राबविला. अकोला पॅटर्न या नावाने भारिप-बहुजन महासंघाने पश्‍चिम वर्‍हाडासह मराठवाड्याच्या राजकारणात नवा पर्याय उपलब्ध करून दिला. अकोल्यात तर बाबासाहेबांचे नातू म्हणून त्यांना मिळालेले प्रेम आतापर्यंत कुठल्याही नेत्याला मिळाले नाही. १९८0 च्या दशकानंतर अँड. आंबेडकरांनी अकोला हीच कर्मभूमी ठरवित राजकारण केले व येथून राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक नेत्यांशी सतत संपर्क व समविचारी आंदोलनात भाग घेऊन आपली सक्रियता कायम ठेवली आहे. अँड. आंबेडकरांनी राजकारणातील भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट ठेवली आहे. महाराष्ट्रात निघालेल्या विविध जातींच्या मोर्चांना त्यांनी सर्मथन दिले नाहीच; मात्र प्रतिमोर्चे काढू नका, असे आवाहन करून जातीय द्वेषाची बीजे अधिक रोवल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेतली. भारिप-बहुजन महासंघाची ह्यव्होटह्ण बँक असलेल्या ओबीसींना बाळासाहेबांच्या या भूमिकेमुळे आश्‍वस्त वाटणे साहजिकच आहे. त्यांच्या अशा सक्रिय भूमिकांमुळेच त्यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी समोर आले होते, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात आहे. २0१९ ची लोकसभा निवडणूक डोळय़ांसमोर ठेवत आता अँड. आंबेडकर ओबीसींच्या परिषदा घेऊन निवडणुकांची पेरणी करीत आहेत. सोबतच राष्ट्रीय राजकारणात डाव्यांसोबत नवी गणिते मांडता येतील का, याचीही चाचपणी करीत असल्याने राष्ट्रपतीपदासाठी त्यांचे नाव येण्यामागे दिल्लीतील डाव्यांसोबत असलेली जवळीक, हेही एक कारण आहेच. यापूर्वीही त्यांनी माकपचे तत्कालीन महासचिव कॉ. प्रकाश कारत यांच्यासमवेत शेगावात कापूस परिषद घेऊन राष्ट्रीय राजकारणात डाव्यांची सोबत केली आहेच, त्यामुळे येणार्‍या निवडणुकीसाठी ते पुन्हा एकदा समविचारी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत असल्याने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे. अँड. आंबेडकरांनी आदिवासी उमेदवाराबाबत आपला आग्रह सोडला असता, तर कदाचित त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले असते. अशावेळी अनेक वर्षांपासून त्यांचा काँग्रेससोबत तुटलेला संबंध पुन्हा जुळला असता, त्यामुळे अकोल्याच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही मोठी उलथापालथ शक्य झाली असती. तसेही सध्या अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या बैठकीत अँड. आंबेडकरांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीमध्ये अँड. आंबेडकरांचे नाव येणे, हे भारिप-बमसं तसेच राष्ट्रीय राजकारणात अँड. आंबेडकरांचे महत्त्व वाढविणारे ठरले आहे.